esakal | लईचं वाईट! घर बांधण्यासाठी ट्रंकमध्ये साठवले पैसै; आयुष्यभराच्या कमाईला वाळवी
sakal

बोलून बातमी शोधा

termites eat money

तुम्ही देखील आपले महत्कष्टाने कमावलेले पैसे डब्यात, ट्रंकमध्ये, गादीखाली साठवून ठेवता का? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

लईचं वाईट! घर बांधण्यासाठी ट्रंकमध्ये साठवले पैसै; आयुष्यभराच्या कमाईला वाळवी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

हैद्राबाद : तुम्ही देखील आपले महत्कष्टाने कमावलेले पैसे डब्यात, ट्रंकमध्ये, गादीखाली सुरक्षित ठेवता का? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आंध्र प्रदेशातील एका व्यक्तीने आपली आयुष्यभराची कमाई बँकेत न ठेवता एका ट्रंकमध्ये सुरक्षित ठेवली होती. मात्र, असं करणं त्याला आता महागात पडलं आहे. जवळपास पाच लाख रुपयांची ही रक्कम त्याने आयुष्यभर पै-पै जोडत जमवली होती. मात्र, प्रामाणिकपणे कमावलेल्या पैशांसोबत असं काही घडलं की त्याला आता त्याचा पश्चात्ताप होत आहे. 

हेही वाचा - राहुल गांधींना भेटून मुलीचा आनंद गगनात मावेना; VIDEO ने नेटकऱ्यांची जिंकली मने

कारण, ज्या ट्रंकमध्ये त्याने हे पैसे सुरक्षित राहतील म्हणून ठेवले होते, तो ट्रंक काही दिवसांनी उघडल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन नक्कीच हादरली असणार. कारण त्याने ट्रंक उघडून पाहिलं की, त्या ट्रंकमधील आयुष्यभराची कमाई असणाऱ्या सगळ्या नोटांना वाळवी लागली होती. या वाळवीने त्याच्या साऱ्या कमाईला खाऊन टाकलं होतं. आपलं स्वत:चं असं एक टुमदार घर बांधण्यासाठी त्याने हे पैसे साठवले होते. 

हेही वाचा - सलग 10 व्या दिवशी इंधन दरवाढ; पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा नवा उच्चांक

बिजली जमालया असं या दुर्दैवी व्यक्तीचं नाव आहे. त्यांचं वय 52 वर्षे आहे. त्याने 100, 500 आणि 2000 च्या नोटा एका ट्रंकमध्ये जपून ठेवल्या होत्या. हे पैसे त्याने मोठ्या कष्टाने कमावले होते. बिजली जमालया हे डुक्कर पालनाचं काम करतात. हातावरचं पोट असणाऱ्या या गरीब बिजलीला वाळवी लागलेले पैसे पाहून अतिव दु:ख झालं असेल यात शंका नाही. त्याच्या उद्योगात काही पैशांची गरज भासली होती. जवळपास 1 लाख रुपये त्याला गरजेचे होते म्हणून त्याने आपल्या साठवलेल्या पैशांतून पैसे काढण्याचा निर्णय घेतला. त्याने आपला ट्रंक उघडला आणि मग त्याला तो अनर्थ दिसून आला. जेंव्हा त्याने हे मातीमोल हे झालेल्या पैशांचे दृश्य पाहिलं तेंव्हा तो जमिनीवर कोसळून धाय मोकलून रडू लागला. त्याच्या कुटुंबियांना देखील मोठा धक्का बसला आहे.