esakal | माथेफिरूचा संसदेत चाकू घेऊन जाण्याचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

माथेफिरूचा संसदेत चाकू घेऊन जाण्याचा प्रयत्न

संसदेत चाकू घेऊन घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव सागर इन्सा असल्याचे स्पष्ट झाले असून, तो दिल्लीती लक्ष्मीनगरचा रहिवासी आहे. विशेष म्हणजे, तो बलात्काराचा आरोप असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंगचा अनुयायी आहे.

माथेफिरूचा संसदेत चाकू घेऊन जाण्याचा प्रयत्न

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : संसदेच्या इमारतीत चाकू घेऊन जाण्याचा प्रयत्न एका माथेफिरू तरुणाने केला आहे. त्याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले असून अटक केली आहे. या तरुणाने संसदेच्या गेट क्रमांक एकमधून संसद प्रांगणात घुसण्याचा प्रयत्न केला. पण, दक्ष सुरक्षा रक्षकांना त्याच्याकडील चाकू शोधून त्याला पकडले. सध्या या तरुणाची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्या तरुणाचे नाव सागर इन्सा असल्याचे स्पष्ट झाले असून, तो दिल्लीती लक्ष्मीनगरचा रहिवासी आहे. विशेष म्हणजे, तो बलात्काराचा आरोप असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंगचा अनुयायी आहे.

अमित शहांची बंद खोलीत तीन तास चर्चा

आचारसंहिता जाहीर करण्याची नेत्यांनाच घाई; मंत्र्यांनीच सांगितली तारीख

संसदेवर झाला होता हल्ला
जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारताच्या संसदेवर २००१मध्ये हल्ला झाला होता. १३ डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांनी हा हल्ला केला होता. पाच दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. या हल्ल्यात सहा दिल्ली पोलिस, संसदेतील दोन सुरक्षा रक्षक हुतात्मा झाले होते. तर, एका माळ्याचाही मृत्यू झाला होता. हल्ला करणाऱ्या पाचही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले होते. हल्ल्याचा मास्टर माईंड मोहम्मद अफझल गुरू याला तपास यंत्रणांनी शोधून काढले होते. त्याच्या विरोधात खटला चालविल्यानंतर न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. अफझल गुरूने दया याचिका दाखल केली होती. पण, तात्कालीन राष्ट्रपतींनी ती फेटाळून लावल्यानंतर ९ फेब्रुवारी २०१३ रोजी अफझल गुरुला दिल्लीतील तिहार कारागृहात फाशी देण्यात आली होती.

loading image
go to top