esakal | अमित शहांची बंद खोलीत तीन तास चर्चा; कोण होते उपस्थित?
sakal

बोलून बातमी शोधा

अमित शहांची बंद खोलीत तीन तास चर्चा; कोण होते उपस्थित?

सोलापुरातील जाहीर सभेनंतर रात्री गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सोबत होते. सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात तिन्ही नेत्यांच्या राहण्याची व्यवस्था होती. तेथीलच एका बंद खोलीत नेत्यांमध्ये तब्बल तीन तास चर्चा सुरू होती. रात्री दहाच्या सुमारास सुरू झालेली ही बैठक सव्वा एकपर्यंत सुरू होती.

अमित शहांची बंद खोलीत तीन तास चर्चा; कोण होते उपस्थित?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप काल (१ सप्टेंबर) सोलापुरात झाला भर पावसात उघड्या वाहनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सभास्थळी आगमन झाले. भाजपने या यात्रेच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. जाहीर सभेत अमित शहा यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. सभा संपल्यानंतर त्यांचा मुक्काम सोलापुरातच होता. रात्री शासकीय विश्रामगृहावर त्यांनी सलग तीन सात बैठक घेतली.

आचारसंहिता जाहीर करण्याची नेत्यांनाच घाई; मंत्र्यांनीच सांगितली तारीख

अजित पवार म्हणाले, ‘आता चित्र लवकर बदलेल’​

सहाजणांमध्येच चर्चा
महाजनादेश यात्रेच्या समारोपात काल झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापुरातील नेते धनंजय महाडिक, उस्मानाबादचे राणाजगजीतसिंह पाटील आणि साताऱ्यातील काँग्रेस नेते जयकुमार गोरे यांनी अमित शहा यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला. जाहीर सभेनंतर रात्री गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सोबत होते. सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात तिन्ही नेत्यांच्या राहण्याची व्यवस्था होती. तेथीलच एका बंद खोलीत नेत्यांमध्ये तब्बल तीन तास चर्चा सुरू होती. रात्री दहाच्या सुमारास सुरू झालेली ही बैठक सव्वा एकपर्यंत सुरू होती. यात भाजपचे प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक, राज्य सहसंघटक व्ही. सतिश, महाराष्ट्रचे प्रभारी भूपेंद्रसिह यादव उपस्थिती होते. विशेष म्हणजे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख,  सहकार मंत्री सुभाष देशमुख,  जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या आमदारांना व नेत्यांना या चर्चेपासून दूर ठेवण्यात आले होते.

कलम ३७०वर शहांनी दिलेली माहिती खोटी; सुप्रिया सुळेंचा दावा

काय म्हणाले अमित शहा?
दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी महाजनादेश यात्रेच्या समारोप सभेला हजेरी लावली. या सभेला पावसाचा थोडा फटका बसला. मुसळधार पावसामुळे काही कार्यकर्त्यांनी मैदान सोडले. पण, अमित शहा यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला लक्ष्य करत जोरदार भाषण केले. कलम ३७०बाबत सरकारने घेतलेल्या निर्णयावर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान शहा यांनी दिले. त्याचबरोबर केंद्रात दहा आणि राज्यात १५ वर्षे सत्ता असताना तुम्ही महाराष्ट्राला काय दिले? असा प्रश्न अमित शहा यांनी शरद पवारांना विचारला आहे.

loading image
go to top