
Manila Rope Facts : एखादा व्यक्ती जेव्हा त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करतो. घरच्याच सिलींग किंवा फॅनला साडी, ओढणी गुंडाळून केलेला आत्महत्येचा प्रयत्न अनेकदा फसलेला आहे. पण, यावेळी असा प्रश्न पडतो की तुरूंगात फाशी देताना काय वापरले जाते. चित्रपटात किंवा प्रत्यक्षात पाहिल्यास लक्षात येईल की, तोही एक दोरच आहे. पण, त्यात असं काय खास आहे. ज्याचा फास इतका आवळतो की, गुन्हेगाराला त्याने केलेले गुन्हे एका क्षणात त्याच्या डोळ्यामसोरून जात असतील.
काही दशकांपासून देशात जिथे कुठे फाशी देण्यात आली आहे. तिथे तिथे केवळ बक्सर जेलमधूनच दोरखंड मागवण्यात आला आहे. अजमल कसाबला पुण्यातील तुरुंगात दिलेली फाशी असो किंवा धनंजय चॅटर्जीला 2004 मध्ये कोलकात्यात दिलेली फाशी असो. त्याच वेळी अफजल गुरूला फाशी देण्यासाठीही बक्सर तुरुंगात बनवलेल्या दोरीचा वापर करण्यात आला. शेवटी इथल्या दोरीत असं काय आहे की कुणाला फासावर लटकवायचं, इथून दोरी मागवली जाते? जाणून घेऊया
या दोरीचे नाव आणि खासियत काय आहे.
बक्सर जेलमध्ये 1930 पासून फाशीचे दोर बनवले जात आहेत. येथे बनवलेल्या दोरीच्या साह्याने फासावर लटकवण्याचे काम अधिक सोपे झाले आहे. फाशीसाठी बनवलेली ही दोरी खास प्रकारची आहे. असे मानले जाते की ही एक अतिशय मजबूत दोरी आहे. या दोरीचा उपयोग पूल बनवणे, जड ओझे वाहून नेणे, जड वजने टांगणे इत्यादीसाठीही वापर होतो.
या दोरीचे नाव काय आहे
या दोरीचे नाव मनिला असे आहे. फिलिपाइन्समधील वनस्पतीपासून ही दोरी बवनण्यात आली आहे. त्यामूळे याचे नाव मनिला असे पडले. पाण्याचा या दोरीवर परिणाम होत नाही. ही दोरी पाणी सुद्धा शोषून घेते.
बक्सर कारागृहात या प्रकारची दोरी बनवणारे तज्ञ आहेत.तसेच येथील कैद्यांनाही ते बनवण्याचे कौशल्य शिकवले जाते. ही दोरी बनवण्यासाठी पूर्वी J-34 सूती दोर खास भटिंडा पंजाबमधून आणला जात होता. पण आता अनेक खाजगी एजन्सी गया किंवा पाटणा येथून पुरवठा करतात. असे मानले जाते की तुरुंगाच्या जवळूनच गंगा नदी वाहते. त्यामुळेच त्याच्या आर्द्रतेचाही दोरीच्या मजबुतीवर आणि पोतवर विशेष प्रभाव पडतो.
दोरी बनवताना अनेक गोष्टींचा वापर केला जातो. फाशीसाठी बनवलेली दोरी विशिष्ट पद्धतीने बनवली जाते. ती बनवण्यासाठी मेणाचाही वापर केला जातो. कापसाचा धागा, पितळी झुडूप, फेविकॉल आणि पॅराशूट दोरी इत्यादींचाही वापर केला जातो. कारागृहातच पॉवरलूम मशीन बसवण्यात आली आहे. हे यंत्र धागे मोजून वेगळे करते.
ही दोरी किती मोठी आहे?
साधारणत: सहा मीटर लांबीची दोरी एखाद्या व्यक्तीला फाशी देण्यासाठी वापरली जाते. परंतु काही वेळा फाशीच्या लांबीनुसार दोरीची लांबीही ठरवली जाते. साधारणपणे या दोरीचे वजन चार किलो किंवा त्याहून अधिक असते. ते बनवण्याचा आदेश येताच कारागृहात त्यावर काम सुरू होते. या दोरीची किंमत 1000 ते 2000 रुपयांपर्यंत आहे. महागाई वाढल्यामुळे आता त्याची किंमत वाढली आहे.
या दोरीचे वजन किती सहन करू शकते?
ही दोरी 80 किलो वजनाच्या व्यक्तीला सहज लटकवू शकते. मात्र, फाशी देण्याच्या एक आठवडा अगोदर ही दोरी निश्चित ठिकाणी पोचवली जाते. ज्यामूळे फाशी देताना जल्लादला फाशीची पूर्वतयारी करता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.