N. Biren Singh : मणिपुरात शांतता नांदेल : बीरेन सिंह

मणिपुरातील वांशिक हिंसाचार कमी होत असून मणिपुरात येत्या सहा महिन्यांत पूर्णपणे शांतता नांदेल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी दिले. केंद्र सरकारच्या मदतीने मणिपूरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित करू, असे सांगतानाच राजीनाम्याची शक्यताही त्यांनी फेटाळली.
N. Biren Singh
N. Biren Singh sakal
Updated on

इंफाळ : मणिपुरातील वांशिक हिंसाचार कमी होत असून मणिपुरात येत्या सहा महिन्यांत पूर्णपणे शांतता नांदेल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी दिले. केंद्र सरकारच्या मदतीने मणिपूरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित करू, असे सांगतानाच राजीनाम्याची शक्यताही त्यांनी फेटाळली. आपण कोणताही गुन्हा किंवा गैरव्यवहार केलेला नाही, त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी सांगितले. मणिपूरमध्ये मे २०२३ पासून कुकी व मैतेई समुदायातील वांशिक हिंसाचारात २२६ जणांचा मृत्यू झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com