शिक्षण मंत्र्यांना CBI कोणत्याही क्षणी अटक करणार? सिसोदिया म्हणाले, तुरुंगात राहावं लागलं तरी..

सिसोदिया यांचं मनोबल वाढवण्यासाठी हजारो कार्यकर्ते त्यांच्या घराबाहेर पोहोचले आहेत.
Manish Sisodia
Manish Sisodiaesakal
Summary

सीबीआय आज मनीष सिसोदिया यांना अटक करू शकते, अशी भीती आम आदमी पक्षाला आहे.

Delhi Excise Policy : दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) आज दारू घोटाळ्याप्रकरणी (Liquor Scam) चौकशीसाठी सीबीआय (CBI) कार्यालयात दाखल होत आहेत.

यादरम्यान सिसोदिया यांचं मनोबल वाढवण्यासाठी हजारो कार्यकर्ते त्यांच्या घराबाहेर पोहोचले आहेत. दरम्यान, सिसोदिया यांच्या घराबाहेर प्रशासनानं मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

Manish Sisodia
Ramgarh Election : मतदानापूर्वीच काँग्रेस नेत्याची गोळ्या झाडून हत्या, नेत्याच्या मृत्यूनं परिसरात खळबळ

सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी जाण्यापूर्वी सिसोदिया यांनी ट्विट केलं की, "आज मी पुन्हा सीबीआय कार्यालयात जात आहे. तपासात मी पूर्ण सहकार्य करेन. लाखो मुलांचं प्रेम आणि करोडो देशवासीयांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. मला काही महिने तुरुंगात राहावं लागलं तरी चालेल. पण, तुम्ही काळजी करू नका. मी भगतसिंग यांचा अनुयायी आहे. अशा खोट्या आरोपांमुळं तुरुंगात जाणं ही छोटी गोष्ट आहे. "

Manish Sisodia
PM मोदींनी उद्घाटन केलेल्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'वर पुन्हा दगडफेक; खिडक्यांचं मोठं नुकसान

सिसोदिया यांच्या ट्विटनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी रिट्विट करत लिहिलं, ''मनीष तुझ्यासोबत देव आहे. लाखो मुलं आणि त्यांच्या पालकांच्या प्रार्थना तुमच्या पाठीशी आहेत. देशासाठी आणि समाजासाठी तुरुंगात जाणं हा शाप नसून गौरव आहे. तू लवकरच तुरुंगातून परत येवो, अशी मी परमेश्वराकडं प्रार्थना करतो. मुलं, पालक आणि आम्ही सर्व दिल्लीवासीय तुमची वाट पाहत आहोत.'' दरम्यान, सीबीआय आज मनीष सिसोदिया यांना अटक करू शकते, अशी भीती आम आदमी पक्षाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com