Manish Sisodia Salute: दिल्लीच्या विधानसभेत सदस्यांकडून सिसोदियांना सॅल्युट! काय घडलं नेमकं?

दिल्लीच्या कथित अबकारी कर घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांची सध्या ईडीकडून चौकशी सुरु आहे.
Delhi Assembly
Delhi Assembly

नवी दिल्ली : दिल्लीच्या कथित अबकारी कर घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरु आहे, यासाठी ते न्यायालयीन कोठडीत आहेत. पण इकडे दिल्लीच्या विधानसभेत चर्चेदरम्यान मात्र त्यांच्यासाठी आपच्या आमदारांनी उभं राहून सॅल्युट केलं आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. (Manish Sisodia Salute by the members of Delhi Assembly what exactly happened)

केजरीवाल म्हणाले, "कोणतंही सरकार करु शकलं नाही ते काम मनिष ससोदिया यांनी करुन दाखवलं आहे. जगाचा इतिहास साक्ष आहे की, जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे लोक येतात आणि व्यवस्थेला आव्हान देतात, तेव्हा त्यांच्यासोबत असाच अन्याय होतो" (Latest Marathi News)

Delhi Assembly
Ketki Chitle: एकीकडं ब्राह्मण तुष्टीकरण अन् दुसरीकड ब्राम्हण असल्याबद्दल अपशब्द; काय म्हणाली केतकी चितळे?

माझी सभागृहाला आणि सर्व सदस्यांना विनंती आहे की त्यांनी सर्वांनी उभं राहून त्यांना सल्युट करावं. मनिष सिसोदिया चांगले व्यक्ती आहेत, असं आवाहन यावेळी केजरीवाल यांनी केलं. त्यानंतर उभं राहून सर्वांनी सॅल्युट केल्यानंतर 'भारत माता की जय' चा जयघोष आणि 'मनिष सिसोदिया जिंदाबाद' अशा घोषणाही देण्यात आल्या. (Marathi Tajya Batmya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com