गुन्हा नोंदवण्यासाठी होता दबाव; सीबीआय अधिकाऱ्याच्या आत्महत्येवर सिसोदिया म्हणाले

भाजपने दारू घोटाळ्यावर खूप गाजावाजा केला
Manish Sisodia Latest News
Manish Sisodia Latest NewsManish Sisodia Latest News

Manish Sisodia Latest News नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी सीबीआय अधिकाऱ्याच्या मृत्यूचा (CBI Officer suicide) आपल्या प्रकरणाशी संबंध जोडत मोठा दावा केला आहे. मनीष सिसोदिया यांनी सोमवारी सांगितले की, माझ्या अटकेसाठी परवानगी देण्याच्या दबावाखाली सीबीआयचे कायदेशीर सल्लागार जितेंद्र कुमार यांनी आत्महत्या केली. यादरम्यान, सिसोदिया यांनी भाजपने केलेले ‘स्टिंग ऑपरेशन’ हा विनोद असल्याचे म्हटले आणि सीबीआयला काहीही सापडले नाही.

दारू घोटाळ्याबाबत भाजपकडून सुरू असलेल्या स्टिंगला उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘हा स्टिंग नसून एक विनोद आहे. भाजपने दारू घोटाळ्यावर खूप गाजावाजा केला. कधी ८ हजार कोटी, कधी ११,००० कोटी तर कधी दीड लाख कोटी केले. ते स्वत: ठरवू शकले नाहीत की घोटाळा कितीचा झाला आहे, असेही सिसोदिया म्हणाले.

Manish Sisodia Latest News
काकांकडून बलात्कार, वेश्याव्यवसाय; रोहित वर्माने उलगडले आयुष्याशी संबंधित रहस्य

‘सीबीआयला माझ्या घरात, बँक लॉकरमध्ये काहीही सापडले नाही. माझ्यावर दोन कंपनीचे व्यवहार जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केला. परंतु, सीबीआयच्या तपासात मला जवळपास क्लीन चिट मिळाली आहे. आता गाडीत कोणाला प्रश्नोत्तरे करून स्टिंग सांगितले जात आहे ते मला कळत नाही. अशाप्रकारे माझ्याजवळही स्टिंग आहे, मी पण करू शकतो. भाजपचे हे स्टिंग नाही तर मजाक आहे’ असेही मनीष सिसोदिया (Manish Sisodia) म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी सीबीआय अधिकारी जितेंद्र कुमार यांनी आत्महत्या (CBI Officer suicide) केली. जितेंद्र कुमार हे सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेत उपविधिमंडळ सल्लागार होते, अशी माहिती मिळाली आहे. कायदेशीर गोष्टी पाहणे हे त्याचे काम होते. एक्साईजच्या प्रकरणात माझ्यावर जी खोटी एफआयआर दाखल करण्यात आली आहे, ती कायदेशीर बाबही ते पाहत होते, असेही सिसोदिया म्हणाले.

Manish Sisodia Latest News
Koffee With Karan : हनीमूनसाठी कतरिनाने आलिया भट्टला दिला सल्ला; म्हणाली...

‘माझ्यावर चुकीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यासाठी कायदेशीर मान्यता देण्यासाठी कुमार यांच्यावर दबाव आणला जात होता. त्याला ते मान्यता देत नव्हते. त्यांच्यावर इतका दबाव होता की मानसिक दबावाखाली आत्महत्या केली. हे प्रकरण खोटे असल्याचे पाहणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्यावर एवढा दबाव टाकण्यात आला की, आत्महत्या करण्यास भाग पाडले. हे अत्यंत दुःखद आहे. हे अत्यंत खेदजनक आहे’, असेही मनीष सिसोदिया म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com