Rohit Verma : काकांकडून बलात्कार, वेश्याव्यवसाय; रोहित वर्माने उलगडले आयुष्याशी संबंधित रहस्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Verma Latest News

काकांकडून बलात्कार, वेश्याव्यवसाय; रोहित वर्माने उलगडले आयुष्याशी संबंधित रहस्य

Rohit Verma Latest News फॅशन डिझायनर रोहित वर्मा ‘बिग बॉस ३’चा स्पर्धक आहे. शो दरम्यान त्याने राष्ट्रीय टेलिव्हिजनवर आयुष्याशी संबंधित रहस्ये उघड केली. रोहितचे (Rohit Verma) नाते बॉलिवूड कलाकारांशी आहे. मुलाखतीत रोहितने आयुष्याशी संबंधित वादांवर खुलेपणाने भाष्य केले. लहानपणी जवळच्या मित्रांनी ३-४ वर्षे त्याचे लैंगिक शोषण केले. स्वत:वर कास्टिंग काउचचा आरोप तसेच वेश्याव्यवसायातून पैसे कमवून डिझायनिंगच्या वस्तू कशा विकत घेतल्या, यावर तो बोलला.

सिद्धार्थ काननने रोहितला शोमध्ये विचारले की, तो पुरुष कलाकारांसोबत रिलेशनशिपमध्ये आहे का? ते लोक उघडपणे समलिंगी, उभयलिंगी आहेत असे म्हणतात का? यावर रोहितने उत्तर दिले, ‘माझा विश्वास आहे की प्रत्येकजण उभयलिंगी आहे. काही लोक त्याबद्दल उघडपणे बोलतात तर काही उघडपणे बोलत नाहीत. मी रिलेशनशिपमध्ये आहे. मी ते नाकारणार नाही. काही लोक हे लपूनछपून करतात. मी उघडपणे बोलण्याची मोठी किंमत मोजली आहे.’

हेही वाचा: #KisiKaBhaiKisiKiJaan : सलमान खानने केला व्हिडिओ पोस्ट; फर्स्ट लूक टीझर

अनेक मोठ्या स्टार्ससोबत अनेक महिन्यांपासून संबंध आहेत. लिव्हइनमध्ये राहीला आहे. एकदा तो प्रियकरासाठी करवा चौथचा उपवास करीत होता. तो आला नाही तर शोधण्यासाठी डिस्कोमध्ये गेला. कार पार्किंगमध्ये पाहिले असता तो कारमध्ये मुलीसोबत सेक्स करीत होता. शांतपणे घरी आलो. पहाटे चारच्या सुमारास अभिनेता परत आला. विचारले असता शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे सांगितले, असेही रोहितने (Rohit Verma) सांगितले.

रोहितने वेश्याव्यवसायाच्या (Prostitution) रॅकेटमध्ये सहभाग असल्याबद्दलही सांगितले. मी चांगल्या कुटुंबातील आहे. कुटुंबातील सदस्य जुन्या विचारांचे आहेत. काकांनी माझ्यावर बलात्कार केला. त्यावेळी मी ८ वर्षांचा होता. हे ३-४ वर्षे चालले. भीतीमुळे आई-वडिलांना सांगू शकलो नाही, असेही रोहितने सांगितले.

हेही वाचा: जान्हवी कपूरचा स्टायलिश लूक; चाहते झाले घायाळ

वेश्याव्यवसायाची सांगितली कहाणी

मुंबईत आलो तेव्हा पैशांची गरज होती. मुलींसारखे कपडे घालून ताजभोवती फिरत राहत होतो. लोकांनी एक-दोनदा नेले. यातून मिळालेल्या पैशातून डिझायनिंगचे सामान घेतले. याचा कोणताही पश्चात्ताप नाही. कारण, असे करायचे होते म्हणून केले. कोणीही जबरदस्ती केली नव्हती, असेही रोहित म्हणाला.

Web Title: Rohit Verma Prostitution Fashion Designer Bollywood

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..