काँग्रेस सावरकरांच्या विरोधात नाही : मनमोहनसिंग

वृत्तसंस्था
Thursday, 17 October 2019

काँग्रेस पक्षाशिवाय इतर कोणीही देशभक्त नाही

- 370 च्या समर्थनार्थ काँग्रेसचा पाठिंबा

नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या मागणीला विरोध केला होता. त्यानंतर आता माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यावर भाष्य केले. काँग्रेस सावरकर यांच्याविरोधात नाही. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या नावाचे पोस्टल तिकीट जारी केले होते, असे ते म्हणाले.

मनिष तिवारी यांनी पत्रकार परिषद घेऊन सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या मागणीला विरोध केला होता. तसेच त्यांनी सावरकर यांना जर भारतरत्न दिला जाणार असेल तर नथुराम गोडसेलाही भारतरत्न मिळणार का?, असा सवाल केला. 

स्मिता पाटिल यांच्याविषयीच्या माहित नसलेल्या गोष्टी...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये 19 व्या शतकातील समाजसुधारक ज्योतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचे आश्वासन देण्यात आले. 

काँग्रेस पक्षाशिवाय इतर कोणीही देशभक्त नाही

काँग्रेस पक्षाशिवाय इतर कोणीही जास्त देशभक्त नाही. देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये भाजप, आरएसएसचे नावही नव्हते. देशभक्तीसाठी कोणत्याही सर्टिफिकेटची गरज नाही, असे डॉ. सिंग म्हणाले.

Deepavali 2019 : अंधशाळेत उजळते डोळस दिवाळी....

370 च्या समर्थनार्थ काँग्रेसचा पाठिंबा

जम्मू काश्मीरातील कलम 370 हटविण्यात आले. त्यापूर्वी मतदान घेण्यात आले होते. याला काँग्रेसने विरोध केला नाही. उलट त्याला पाठिंबाच दिला, असेही ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manmohan singh on savarkar issue