Mann Ki Baat : आणीबाणी हा काळा कालखंड,मोदींची टीका; ‘मन की बात’द्वारे जलसंवर्धनावरही चर्चा

भारताच्या इतिहासातील हा एक काळा कालखंड होता. लाखो लोकांनी संपूर्ण शक्तीनिशी आणीबाणीचा विरोध केला.
mann ki baat dark chapter history of the india  pm modis attack on congress from mann ki baat politics
mann ki baat dark chapter history of the india pm modis attack on congress from mann ki baat politicssakal

नवी दिल्ली : ‘भारतात २५ जून रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती. हा भारताच्या इतिहासातील काळा कालखंड होता,’ असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे टीका केली. दर महिन्याच्या अखेरच्या रविवारी प्रसारित होणारा ‘मन की बात’हा आकाशवाणीवरील कार्यक्रम मोदींच्या अमेरिका दौऱ्यामुळे एक आठवडा आधी प्रसारित करण्यात आला.

जनतेशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी यांनी आणीबाणीचा उल्लेख केला. ते म्हणाले,‘‘ भारताच्या इतिहासातील हा एक काळा कालखंड होता. लाखो लोकांनी संपूर्ण शक्तीनिशी आणीबाणीचा विरोध केला. लोकशाहीच्या समर्थकांवर त्या काळात झालेल्या अत्याचारांबद्दल आठवून आजही मनाचा थरकाप उडतो. त्या अत्याचारांची माहिती असलेली पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. ’’

mann ki baat dark chapter history of the india  pm modis attack on congress from mann ki baat politics
Amit Shah : पुणे, मुंबईसह सात शहरांसाठी आपत्ती निवारणासाठी ८ हजार कोटी; गृहमंत्री शहा यांची घोषणा

गुजरातच्या किनाऱ्याला धडकलेल्या बिपोरजॉय चक्रीवादळाचा उल्लेख करत मोदींनी, या वादळाचा हिमतीने सामना केल्याबद्दल कच्छमधील नागरिकांचे कौतुक केले. जलसंवर्धनासाठी आणि नैसर्गिक स्रोतांच्या रक्षणासाठी झालेल्या प्रयत्नांची काही उदाहरणे देताना पंतप्रधानांनी नगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाचाही उल्लेख केला.

mann ki baat dark chapter history of the india  pm modis attack on congress from mann ki baat politics
PM Modi US Visit : मोदींच्या अमेरिका दौऱ्यात होणार अंतराळ संबंधांवर चर्चा; गगनयान मोहिमेसाठी नासा करू शकतं मदत

या धरणाच्या कालव्याचे काम पूर्ण होत असून काही दिवसांपूर्वीच पाणी सोडण्याची चाचणी झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान व्यवस्थापनाबद्दल त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचेही स्मरण केले. ते म्हणाले,‘‘छत्रपती शिवाजी महाराजांची शासनपद्धती आणि व्यवस्थापन कौशल्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. महाराजांनी जलव्यवस्थापन आणि नौदलाबाबत केलेले कार्य भारतीय इतिहासाचा गौरव वाढविणारे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com