esakal | सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन करा आणि संसर्गाला दूर ठेवा, असे आवाहन कोरोना योद्ध्यांनी देशातील जनतेला केले.

बोलून बातमी शोधा

अवकाश मोहिमेपासून, डिजीटल व्यवहारांपर्यंत मोदींनी केली 'मन की बात'

सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन करा आणि संसर्गाला दूर ठेवा, असे आवाहन कोरोना योद्ध्यांनी देशातील जनतेला केले.

घाबरू नका, नियम पाळा; कोरोना योद्ध्यांसोबत मोदींची मन की बात
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन करा आणि संसर्गाला दूर ठेवा, असे आवाहन कोरोना योद्ध्यांनी देशातील जनतेला केले. आज ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः संवाद साधण्यापेक्षा संवादकाच्या भूमिकेतून, कोरोनाविरुद्धच्या लढाईत सक्रिय भूमिका बजावणारे डॉक्टर, नर्स, रुग्णवाहिका चालकासारख्या कोरोना योद्ध्यांचे आणि कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे अनुभव देशवासीयांना ऐकवले. तसेच, केंद्राकडून मोफत लस मिळत असल्याने राज्य सरकारांनी अधिकाधिक वेगाने लसीकरण करावे, अशी सूचना मोदी यांनी राज्य सरकारांना केली.

आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या ७६ व्या भागामध्ये बोलताना पंतप्रधान म्हणाले की, सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या लाटेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. कोरोना आमच्या धैर्याची आणि दुःख सहन करण्याची कसोटी पहात आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत देश एकजूटपणे वादळाचा मुकाबला करत आहे. सर्वजण एकमेकांना सहकार्य करत आहेत. ग्रामीण भागातदेखील लोक आरोग्य नियमांचे पालन करत आहेत. लस आली असली तरी पंतप्रधानांनी, ‘दवाई भी और कडाई भी’ या मंत्राचे स्मरण करून दिले. तसेच, कोरोना लशीबाबतच्या अफवांवर बिलकुल विश्वास ठेवू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी जनतेला केले.

हेही वाचा: West Bengal : मतदानावेळी कोरोना प्रोटोकॉल पाळा - PM मोदी

कोरोना योद्ध्यांचे अनुभव
- डॉ. शशांक जोशी (मुंबई) :
अनेक लोक उशिरा उपचार सुरू करतात. सुरवातीच्या काळात रुग्णांनी स्वस्त आणि योग्य औषधांवर जास्त भर द्यावा. सरसकट महागडी औषधे घेण्याचा सोस टाळावा. रेमडेसिविर सारख्या औषधांचा फायदा आहे. मात्र त्यांच्या मागे धावणे अयोग्य आहे.
- डॉ. नावेद (श्रीनगर) : ९०-९५% लोक औषधे न घेताच बरे होत आहेत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मास्क आणि हात स्वच्छ धुणे यासारख्या उपाययोजनांचा कटाक्षाने वापर करावा. पहिली लस घेतल्यावर ताप येणे हे सर्वसामान्य आहे.

- सिस्टर भावना वत्स (रायपूर) : पहिल्यांदा जेव्हा एका कोवीड रुग्णालयात माझी ड्युटी लागली, तेव्हा घरातले लोक घाबरून गेले. रुग्णालयातील रुग्णही घाबरलेले होते. आम्ही त्यांना दिलासा देणारे चांगले वातावरण रुग्णालयात ठेवले.

हेही वाचा: ब्रिटन, सिंगापूरकडून ऑक्सिजन-व्हेंटिलेटर्सची पहिली खेप भारताकडे रवाना

- सिस्टर सुरेखा (बंगळूर) : जबाबदार नागरिक म्हणून सर्वांनी चाचणी करून घ्यावी. लक्षणे दिसली तर घरातच विलगीकरणात राहावे आणि आरोग्य नियमांचे पालन करावे. काढा प्या, प्राणायाम करा.

- प्रेम वर्मा,रुग्णवाहिका चालक (दिल्ली) : माझ्या बरोबर काम करणारे इतर अनेक जण नोकरी सोडू लागले तेव्हा माझ्या आईनेही मला नोकरी सोडण्यास सांगितले. मात्र मी तिला म्हटले की मी नोकरी सोडली तर या रुग्णांची सेवा कोण करेल. (यावर पंतप्रधानांनी, आईला दुखवू नका. मात्र तिला रुग्णसेवेचे महत्त्व समजावून सांगा, असे वर्मा यांना सांगितले.)

- प्रीति चतुर्वेदी, कोरोनामुक्त (उत्तर प्रदेश) : कोरोना चाचणीचा पॉझिटिव्ह अहवाल येताच मी त्वरित विलगीकरणात गेले. आहार-विहाराचे पथ्य कटाक्षाने पाळत गेले. सकारात्मक राहिले.