esakal | Mann Ki Baat: नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना फायदा- PM नरेंद्र मोदी
sakal

बोलून बातमी शोधा

MANN KI BAAT

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमातून देशातील जनतेशी संवाद साधला

Mann Ki Baat: नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना फायदा- PM नरेंद्र मोदी

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमातून देशातील जनतेशी संवाद साधला. या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींनी कृषी कायद्यांवर भाष्य केलं. त्यांनी या नवीन कायद्याचे विविध उदाहरणे देऊन फायदेही सांगितले. सध्या देशभरात कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी मोठी आंदोलने सुरु केली आहेत. यामध्ये पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकरी या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत निदर्शने करत आहेत. विरोधकांनी या नवीन कायद्यांना 'काळे कायदे' असंही म्हटलं आहे.

'मन की बात'मध्ये पंतप्रधान काय म्हणाले-

-भारतात शेती आणि त्याच्या सलग्न व्यवसायात वाढ होत आहे.

-नवीन कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन पर्याय खूले झाले आहेत.

-या कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होतील.

-हे कायदे बऱ्याच चर्चेनंतर भारताच्या संसदेत मंजुर झाले आहेत.

Corona Updates: दिल्ली, केरळ आणि महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढला

- या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना नवीन अधिकार मिळणार आहेत.

-राजस्थानमधील शेतकरी मोहम्मद अस्लम यांचा उल्लेख. बारा जिल्ह्यातील अस्लम स्थानिक शेतकरी उत्पादन संघाचे CEO आहेत.

-हरियाणातील शेतकरी वीरेंद्र यांच्या शेतातील पाचट व्यवस्थापनाबद्दही स्तुती केली आहे.

-अन्रपुर्णाची मुर्ती कॅनडातून माघारी आणण्याचे निर्देश

-हिवाळ्यात लहान मुलं आणि जेष्ठांची काळजी घेण्याचे आवाहन.

हेही वाचा- शत्रूंना त्यांच्याच देशात जाऊन संपवणारी इस्त्राईलची 'मोसाद'; इराणी अणु शास्त्रज्ञाच्या हत्येने पुन्हा चर्चेत

-भारतीय संस्कृती संपूर्ण जगासाठी आकर्षणाचे केंद्र.

-गुरुनानक यांचाही उल्लेख, त्यांची आठवण

- डॉ सलीम अली यांचाही उल्लेख