

दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर महिलेसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या नेत्याला दुसऱ्याच दिवशी जामीन देण्यात आला आहे. मनोहर लाल धाकड हे भाजपचे नेते होते. मात्र व्हिडीओ व्हायरल होताच त्यांचं पक्षाचं सदस्यत्व रद्द करण्यात आलंय. मनोहर धाकड यांचे एक दोन नव्हे तर तब्बल तीन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मुंबई-दिल्ली ८ लेनचा एक्सप्रेस वे असून त्यावर महिलेसोबत नंगानाच करणाऱ्या या नेत्याचे आणखी काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी ब्लॅकमेल केल्याचंही आता समोर आलं आहे.