Maratha Reservation : मराठा आरक्षणप्रश्नी दिल्लीत सर्वपक्षीय खासदारांची बैठक; 'हे' मोठे नेते राहणार उपस्थित

राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना दिल्लीतली आरक्षणाची लढाई संभाजीराजे छत्रपती यांनी हाती घेतली असल्याचं दिसून येत आहे.
Maratha Reservation
Maratha Reservationesakal

नवी दिल्लीः राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना दिल्लीतली आरक्षणाची लढाई संभाजीराजे छत्रपती यांनी हाती घेतली असल्याचं दिसून येत आहे. याच प्रश्नासंबंधी त्यांनी मागे केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेतली होती. आता त्यांनी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय खासदारांची एक बैठक बोलावली आहे.

संभाजीराजे यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी शरद पवार, नितीन गडकरी, नारायण राणे हे नेते उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. संभाजीराजेंकडून यांच्यासह राज्यातल्या सर्व खासदारांना निमंत्रण पाठवण्यात आलेले आहे. महाराष्ट्र सदनामध्ये ही बैठक बोलावल्याची माहिती आहे.

Maratha Reservation
Maratha Reservation : इतरांच्या आरक्षणाला धक्का नको; विधान परिषदेमध्ये मराठा नेत्यांची भूमिका

महाराष्ट्रात ऐरणीवर असलेल्या मराठा आरक्षण या प्रश्नावर सर्व खासदारांनी एकमताने संसदेत आवाज उठवावा, याकरीता छत्रपती संभाजीराजे यांनी दिल्ली येथे राज्यातील सर्व लोकसभा व राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठक बोलावली आहे. ही बैठक १८ डिसेंबर रोजी महाराष्ट्र सदन येथे होणार आहे.

बैठकीला कोणते खासदार उपस्थित राहतात, याकडे महाराष्ट्रातील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. संसदेत आवाज उठवून आरक्षणाची मर्यादा कशी वाढवता येईल, याबाबत बैठकीमध्ये विचारविनिमय होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आणखी एक अल्टिमेटम दिला असून मराठा आरक्षणासाठी सरकारने आजपर्यंत कोणती कार्यवाही केली आणि २४ तारखेला कोणता निर्णय घेणार आहात, याबाबत खुलासा करण्याची मागणी केली आहे.

Maratha Reservation
Chhagan Bhujbal : "मी मोठं-मोठे लोक अंगावर घेतलेत, तू किस झाड की पत्ती", भुजबळांचा जरांगेंना इशारा

सरकारने १७ तारखेपूर्वी माहिती दिली नाही तर १७ तारखेला आंदोलन जाहीर केलं जाईल आणि त्यानंतर सरकारचा आणि आमचा संबंध नसेल, अशी भूमिका त्यांनी जाहीर केलीय. त्यामुळे २४ तारखेचं मराठा समाजाचं आंदोलन निश्चितपणे होण्याची शक्यता दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com