धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपरिषदेसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राजकीय वातावरण तापु लागले आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबर पासून सुरू झाली असुन 15 नोव्हेंबर रोजी अर्जांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.आत्तापर्यंत आठपैकी सात नगरपरिषदेसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी तब्बल 299 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.