दिल्ली प्रदूषण : अरविंद केजरीवाल खट्टर यांच्या भेटीला

वृत्तसंस्था
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

या दोन्ही नेत्यांमध्ये होणाऱ्या या चर्चेनंतर यावर काय उपाययोजना केल्या जातात, याकडे दिल्लीतील जनतेचे लक्ष लागले आहे.

नवी दिल्ली : दिल्ली प्रदूषणाचा विषय चांगलाच गाजत असताना यावर चर्चा करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये विषारी वायूचे वाढते प्रमाण आणि वायू प्रदूषण यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राजधानी दिल्लीत वायू प्रदुषणामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. त्यामुळे या मुद्यावरुन दिल्ली सरकारवर विविध स्तरातून टीका केली जात आहे. याशिवाय हरित लवादानेही दिल्ली सरकारला खडेबोल सुनावले होते. या सर्व घडामोडींनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल हे हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत.

याबाबत केजरीवालांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. "दिल्लीचे पर्यावरणमंत्री इम्रान हुसेन, पर्यावरण सचिव केशवचंद्र आम्ही सर्व हरियाणाला जाण्यासाठी मार्गस्थ झालो आहोत. यादरम्यान मनोहरलाल खट्टर आणि त्यांच्या टीमशी चर्चा केली जाणार आहे". दरम्यान, या दोन्ही नेत्यांमध्ये होणाऱ्या या चर्चेनंतर यावर काय उपाययोजना केल्या जातात, याकडे दिल्लीतील जनतेचे लक्ष लागले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: marathi news delhi pollution arvind kejriwal meets khattar