
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या बाकावरून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा त्वरित, मिळावा अशी आग्रही मागणी आज राज्यसभेत करण्यात आली. अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी भारत सरकारचे जे निकष आहेत त्या सर्व कसोट्यांवर मराठी भाषा पूर्णपणे उतरते त्यामुळे मराठीला हा दर्जा त्वरित मिळावा अशी मागणी खासदार डॉ. भागवत कराड यांनी केली. रंगनाथ पठारे समितीनेही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे हे सप्रमाण सांगितल्याचे डॉ. कराड यांनी नमूद केले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शून्य प्रहरात बोलताना डॉ. कराड म्हणाले, की देशात ज्या ६ भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मिळाला आहे त्यात तमीळ, संस्कृत, कन्नड, तेलगू, मल्याळम व उडिया यांचा समावेश आहे. या अर्थाने मराठी साक्षात अभिजात भाषा आहे. अभिजात भाषा दर्जा मिळण्याचे फायदे भाषेच्या संवर्धनासाठी होतात. त्यात मराठीतील बोलीभाषांचा अभ्यास, संशोधन व साहित्यसंग्रह करणे, देशातील ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिक्षणाची सोय करणे, राज्यातील १२ हजार ग्रंथालये सशक्त करणे, मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना भरीव साह्य करणे हे फायदे आहेत. ही मागणी का होते ? कारण अभिजात दर्जा मिळाल्यावर भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्राकडून त्या त्या राज्याला अनुदान मिळते. इंग्रजीच्या अतिवापरामुळे संपूर्ण देशातील बहुतेक भारतीय भाषांचा उपयोग घटत चालला आहे.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.