Crime News : मथुरेतील हत्येच्या घटनेने खळबळ; आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची पाच पथके तैनात

विजयच्या मृतदेहावर गुरुवारी सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. विजयच्या मामाने सांगितलं की, सून पिंकी आणि धाकटा भाचा अजयची पत्नी निशा यांनी कुटुंबामध्ये अशा प्रकारे द्वेष पसरवला की प्रकरण घटस्फोटापर्यंत जावून पोहोचलं.
Crime News
Crime Newsesakal

नवी दिल्लीः मथुरा येथील ठाणे महामार्गावरील एटीव्ही परिसरमधील माहोली गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. विजय नावाच्या युवकाची हत्या झाली, त्यामुळे परिसर हादरुन गेला आहे.

मृत्यू झालेल्या विजयच्या मामाने या प्रकरणी गंभीर आरोप केल्याने प्रकरण उघडकीस आलेलं आहे. विजयच्या फोनवरुन त्याच्या पत्नीने कुठल्यातरी पुरुषासोबत बातचित केली होती. तो कॉल रेकॉर्ड झाला होता. विजयाने या प्रकरणाचा विरोध केला, त्यावरुन एक वर्षापूर्वी घरामध्ये भांडण सुरु झालं. या भांडणामुळे दोन कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. चार महिन्यांचं बाळ यामुळे अनाथ झालं आहे.

तेवीस वर्षीय विजयच्या मृतदेहावर गुरुवारी सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. विजयच्या मामाने सांगितलं की, सून पिंकी आणि धाकटा भाचा अजयची पत्नी निशा यांनी कुटुंबामध्ये अशा प्रकारे द्वेष पसरवला की प्रकरण घटस्फोटापर्यंत जावून पोहोचलं.

Crime News
Ambadas Danve : ''मी निष्ठावान शिवसैनिक, कुठेही जाणार नाही'' अंबादास दानवेंनी स्पष्ट केली भूमिका

त्या दोघी सासऱ्यावर संशय घेत होत्या. सासऱ्याची नियत चांगली नाही, असं त्या म्हणायच्या. गुरुवारी घटस्फोटाच्या चर्चेसाठी आमदाराच्या घरी बैठक ठेवण्यात आलेली होती. परंतु कुठल्यातरी कारणाने ही बैठक टळली.

Crime News
Update: दिवसभरात राज्यात अन् देशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

विजयच्या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी पाच पथके तैनात करण्यात केली आहेत. शुक्रवारी आरोपींच्या नातेवाईकांच्या घरांवर आणि इतर संभाव्य ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com