याड लावणारं इंग्रजी; तरुणीनं शेअर केली 74 वर्षीय रिक्षाचालकाची कहाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

याड लावणारं इंग्रजी; तरुणीनं शेअर केली 74 वर्षीय रिक्षाचालकाची कहाणी

याड लावणारं इंग्रजी; तरुणीनं शेअर केली 74 वर्षीय रिक्षाचालकाची कहाणी

व्यवसायाने रिक्षा चालक, पण फाड फाड इंग्रजी बोलत आणि दिवसभर कष्ट करून ग्राहकांना हव्या त्या ठिकाणी पोहोचविणारे हे बेंगळुरूचे पताबी रामन (Pataabi Raman). वयाच्या ७४ व्या वर्षी शरीर जरी म्हातारे होत असले तरी काळासोबत त्यांचे निर्णय आणि धैर्य अधिक मजबूत होत आहे. सध्या आदर्श मानत कित्येक तरुण-तरुणींसह सर्वजण प्रभावित होत आहे. त्यांच्याशी संबंधित एक पोस्ट सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल झाली आहे.

सोशल मीडियावर नेहमी लोक काही ना काही पोस्ट शेअर करता असतात, जी कित्येकदा खूप रोमांचक असते तर कित्येकदा थक्क करणारी असते. सध्या अशीच एक पोस्ट व्हायरल होतेय जी सर्वांनाच थक्क करत आहे. एक कॉलेज रिटार्यड लेक्चरर आता रिक्षा चालवत आहे हे ऐकून तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. कारण ७४ वर्षांचे आजोबा एक रिक्षा चालक आहेत, ग्राहकांसोबत फाड फाड इंग्लिशमध्ये गप्पा मारून प्रत्येकाला थक्क करत आहे.

निकिता अय्यरने त्यांच्या या कौशल्याकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म( Social Media Platforms) लिंक्डइनवर(LinkedIn) एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्यांनी ७४ वर्षाच्या पताबी रामन(Pataabi Raman) यांचा उल्लेख केला आहे. निकाताने आपल्या पोस्टमध्ये (Post)सांगितले आहे की, बंगळूरूमध्ये तिला एक असे रिक्षाचालक भेटले जे फाडफाड इंग्रजी बोलत होते, जे ऐकून ती थक्क झाली.

हेही वाचा: Lakme Fashion Week 2022 : पुरुषाने स्कर्ट घालून का केला Ramp Walk?

निकिता सांगते की, '' मला त्या ४५ मिनिटामध्ये जेव्हा पताबी रमन यांच्या आयुष्यासंबधी काही खास क्षणांबाबत जाणून घेण्याची संधी मिळाली. आता सोशल मीडियामुळे माध्यमातून आता कित्येक लोक त्यांच्याबाबत जाणून घेत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये निकिता अय्यरने सांगितले की, ''मला ऑफिसला जाण्यासाठी उशीर झाला होता तेव्हा पताबी रामन यांनी तिला कुठे जायचे आहे विचारले. तिने जेव्हा सांगितले की, मला शहराच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या माझ्या ऑफिसला जायचे आहे आणि मला आधीच खूप उशीर झाला आहे तेव्हा, पताबी रामन यांनी इंग्रजीमध्ये दिलले उत्तर ऐकूण मीआश्चर्यचकित झाले''

निकिताने सांगितले की, ''मला ऑफिसला पोहचण्यासाठी ४५ मिनिटांचा वेळ लागला, ज्यामध्ये मी त्यांना विचारले की, त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे इंग्रजी कशी काय बोलता येते? तेव्हा उत्तर देताना पताबी रामन यांनी सांगितले की, ''ते मुंबईच्या एका कॉलेजमध्ये इंग्रजीचे लेक्चरर (English lecturer) होते. त्यांनी MA आणि MEd केले आहे.''

हेही वाचा: अतिथंड पाणी प्यायल्याने मंदावतो Heart Rate; आरोग्याचे होते नुकसान

पताबी रामन पुढे म्हणाले की, ''आता तुम्ही विचाराल की मग मी रिक्षा का चालवत आहे? कॉलेजचे लेक्चरर म्हणून निवृत्त झाल्या पासून म्हणजेच, गेल्या 14 वर्षांपासून मी ऑटो चालवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्नाटकात नोकरी न मिळाल्याने मुंबईत लेक्चरर म्हणून काम केल्याचे त्यांनी पुढे सांगितले. ते म्हणाला की, त्याला फक्त 'जात' विचारली जाते. कर्नाटकातील कॉलेजेमधून मिळालेल्या प्रतिसादाला कंटाळून मी मुंबई, महाराष्ट्रात गेलो, जिथे त्याला एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये मला नोकरी मिळाली.''

हेही वाचा: Seasonal Allergiesमुळे होणाऱ्या अस्थमाचा उपचार झाला सोपा: संशोधकांचा दावा

वयाच्या 60 व्या वर्षी सेवानिवृत्त होण्यापूर्वी, त्यांनी पवईतील एका महाविद्यालयात 20 वर्षे काम केले आणि त्यानंतर कर्नाटकातील बेंगळुरू येथे परत गेले. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ''शिक्षकांना पगार मिळत नाही. तुम्ही जास्तीत जास्त 10 ते 15,000/- कमवू शकता आणि ती एक खाजगी संस्था होती, त्यामुळे मला पेन्शन मिळाली नाही. रिक्षा चालवून मला दिवसाला किमान 700 ते 1500/- रुपये मिळतात. माझ्यासाठी आणि माझ्या 'गर्लफ्रेंडसाठी ते पुरेसे आहे.

'गर्लफ्रेंड' या शब्दावर हसत ते म्हणाले की, ''ते त्याच्या पत्नीला त्यांची मैत्रीण मानतात.'

त्यांनी पुढे सांगितले की त्यांना एक मुलगा आहे जो भाडे भरण्यात मदत करतो. आम्ही मुलांवर अवलंबून नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ते त्यांचे जीवन जगतात आणि आम्ही आमचे जीवन आनंदाने जगत आहोत.

पताबी रामन यांची स्तुती करताना निकिताने पोस्टच्या शेवटी लिहिले की, "आयुष्याकडून कोणतीही तक्रार नाही. कोणतीही खंत नाही. या लपलेल्या हिरोमधून शिकण्यासारखे खूप काही आहे.' या पोस्टला आतापर्यंत 73,583 हून अधिक लोकांनी लाईक केले आहे आणि 2,300 हून अधिक लोकांनी शेअर केले आहे. .

Web Title: Meet The Bengaluru Auto Driver Who Used To Be An English Lecturer

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..