Meghalaya Minister Resignations: मेघालयमध्ये राजकीय हालचालींना वेग; 12 पैकी आठ मंत्र्यांचे राजीनामे; जाणून घ्या, नेमकं कारण?

Meghalaya eight ministers resignations : राजीनामा दिलेल्यांमध्ये एनपीपी, यूडीपी, एचएसपीडीपी आणि भाजपच्या मंत्र्यांचाही समावेश आहे.
66 Percent of Meghalaya ministers resign, sparking major political crisis and uncertainty in the state government.

66 Percent of Meghalaya ministers resign, sparking major political crisis and uncertainty in the state government.

esakal

Updated on

मेघालयमध्ये राजकीय भूकंप घडला आहे. भाजप आघाडीच्या या राज्यात १२ पैकी आठ मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. ज्या मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे, त्यामध्ये एनपीपी, यूडीपी, एचएसपीडीपी आणि भाजपच्या मंत्र्यांचाही समावेश आहे.

राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांममध्ये एनपीपीचे अम्पारीन लिंगदोह, कॉमिंगोन येम्बोन, रक्कम ए. संगमा आणि अबू ताहीर मंडल, यूडीपीचे पॉल लिंगदोह आणि करिमेन शायला एचएसपीडीपीचे शकलियार वारजरी आणि भाजपचे ए एल हेक यांचा समावेश आहे. मेघालय कॅबिनेट विस्ताराआधी ही मोठी घडामोड घडली आहे.

मेघालयमध्ये सध्या नॅशनल पीपुल्स पार्टीचं सरकार आहे, ज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री कोनराड संगमा करत आहेत. तसेच या सरकारमध्ये अनेक पक्ष सहभागी आहेत. हे सरकार मेघालय डेमोक्रेटिक अलान्यस नावाच्या आघाडीवर आधारित आहेत. ही आघाडी २०२३च्या विधानसभा निवडणुकीनंतर बनली होती. ६० सदस्यीय विधानसभेत १२ मंत्री होते, ज्यापैकी आठ जणांनी राजीनामा दिला.

66 Percent of Meghalaya ministers resign, sparking major political crisis and uncertainty in the state government.
मोदी सरकार हिंदू-मुस्लिम कार्ड खेळतंय... राहुल गांधी सकारात्मक विचाराचे! Shahid Afridi च्या विधानाचा BJP कडून समाचार

कॅबिनेट विस्ताराआधी असं यासाठी केलं गेलं, कारण मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकेल. नव्या मंत्र्यांना आज सायंकाळी राजभवनात शपथ दिली जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, एनपीपी आणदार वैलादमिकी शायला, सोस्थनीस सोहतुन, ब्रेनिंग ए. संगमा आणि टिमोथी डी शिरा मंत्रिमंडळ सहभागी होते.

66 Percent of Meghalaya ministers resign, sparking major political crisis and uncertainty in the state government.
Supreme Court: देशभरातील पोलिस ठाण्यांसाठी मानवी हस्तक्षेपाशिवाय सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाची मागणी, सर्वोच्च न्यायालय

याशिवाय यूडीपी प्रमुख मेतबाह लिंगदोह आणि माजी मंत्री लखमेन रिम्बुई यांचीही शपथ घेण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एचएसपीडीपी आमदार मेथोडियस दखार मंत्रिमंडळात शकलियार वारजरी यांची जागा घेतील, तर भाजपचे सनबोर शुल्लई मंत्रिमंडळात एएल हेक यांची जागा घेतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com