मला 17 राजकीय पक्षांचा पाठिंबा - मीरा कुमार

Meera Kumar
Meera Kumar

नवी दिल्ली - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) उमेदवार मीरा कुमार यांनी माझ्या नावाला 17 राजकीय पक्षांचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जुलैमध्ये होत असून, मीरा कुमार यांच्याविरोधात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार रामनाथ कोविंद असणार आहेत. मीरा कुमार यांनी आज (मंगळवार) प्रथमच पत्रकार परिषद घेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील आपल्या उमेदवारीबाबत माहिती दिली.

मीरा कुमार म्हणाल्या, की अहमदाबादमधील साबरमती आश्रमापासून मी प्रचाराला सुरवात करणार आहे. विरोधी पक्ष हे एकाच विचारसरणीवर एकत्र टिकून आहेत. विरोधी पक्षांनी मला या पदासाठी योग्य समजल्याने मी त्यांचे आभार मानते. जातीव्यवस्थेला विरोध, माध्यमांचे स्वातंत्र्य, विरोधी पक्षांची एकजूट हे विषय माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. हीच विचारसरणी घेऊन मी पुढे जाणार आहे. जातीव्यवस्थेला जमिनीत गाडले पाहिजे. राष्ट्रपतीपदासाठी दलित व्यक्तीला उमेदवारी देत असल्याचे जोरात चर्चा होत असल्याने यातून समाजाची मानसिकता दिसून येत आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
अन् मोदींच्या पत्नीसाठी गार्डने उघडला कारचा दरवाजा​
कट्टर मुस्लिम दहशतवाद संपवून टाकू; मोदी-ट्रम्प यांचे संयुक्त निवेदन​
"काश्‍मिरी बांधवां'चे रक्त सांडणाऱ्या भारतीयांना धडा शिकवू: अल कायदा​
पुणे: चार धरणांत मिळून 0.12 टीएमसीने वाढ​
माण: बोअरवेलमध्ये पडलेल्या मंगेशचा अखेर मृत्यू
सलाहुद्दीनला ठरविले जागतिक दहशतवादी​
सर्जिकल स्ट्राइकवर एकही प्रश्‍न नाही: नरेंद्र मोदी​
मुख्यमंत्र्यांना विठ्ठल पूजेपासून रोखणार​
शाहू कार्यात तंत्रज्ञानाधारित रोजगाराची बीजं - डॉ. रघुनाथ माशेलकर​
३१ दिवस, पावणे चारशे तास आणि ४६ हजार पोळ्या​ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com