'या' देशातील महिलांना Menstrual Products मिळणार फ्री, नवा कायदा

देशातील महिलांच्या समस्या लक्षात घेता त्यातील एका महत्वाच्या विषयावर आता स्कॉटलंड शासनानं नवं पाऊल उचललंय
Menstrual products free rule in Scotland
Menstrual products free rule in Scotlandesakal

देशाची प्रगती होण्यासाठी देशातील सगळ्या स्तरांवर लक्ष देणे गरजेचे असते. महिलांचे शिक्षण, प्रशिक्षण, सशक्तीकरण आणि आरोग्याच्या समस्यांवर देशाच्या प्रगतीची टक्केवारी अवलंबून असते. देशातील महिलांच्या समस्या लक्षात घेता त्यातील एका महत्वाच्या विषयावर आता स्कॉटलंड शासनानं नवं पाऊल उचललंय. आता स्कॉटलंडमध्ये महिलांना Menstrual Product मोफत मिळणार आहेत. (Menstrual products free rule in Scotland)

स्कॉटलंडमधील सार्वजनिक सुविधांमध्ये आता Menstrual Product विनामूल्य उपलब्ध करून दिली जातील. हा नवा कायदा स्कॉटीश खासदारांनी २०२० मध्ये एकमताने मंजूर केला होता. अति गरीब, दारिद्र्य रेषेखाली मोडणाऱ्या महिलांना मासिक पाळीत होणारे त्रास आणि पैश्याअभावी सॅनिटरी पॅडचा वापर करत नसलेल्या महिलांची परिस्थिती लक्षात घेता स्कॉटलंड शासनाने एक चांगलं पाऊल उचललेलं आहे. महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणारं स्कॉटलंडने उचललेलं पाऊल हे महत्वाचं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही.

Menstrual products free rule in Scotland
Menstrual Hygiene Day: पाळीदरम्यान अस्वच्छ राहण्याचे होतील गंभीर परिणाम; कशी राखावी स्वच्छता?

स्कॉटलंडमधील नव्या कायद्यानुसार स्कॉटलंडमध्ये शाळा आणि विद्यापीठांसह सार्वजनिक इमारतींमध्ये मासिक पाळीमध्ये वापरले जाणारे सॅनिटरी पॅड्स उपलब्ध असतील. Menstrual Product विनामूल्य असून त्याची जनतेस खात्री देणे ही जबाबदारी स्थानिक अधिकारी आणि शिक्षण पुरवठागारांची असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com