वेल डन! 'मर्सल'ने महत्त्वाचा विषय मांडलाय- रजनीकांत

वृत्तसंस्था
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

"महत्त्वाच्या विषयाला हात घातला... उत्तम केले. मर्सलच्या टीमचे अभिनंदन," असे रजनीकांत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

चेन्नई : अभिनेते विजय यांची प्रमुख भूमिका असलेल्या मर्सल या चित्रपटातील संवाद आक्षेपार्ह असल्याचे सांगत भाजप सरकारकडून कात्री लावण्यात येत असल्यामुळे चित्रपट रसिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आता सुपरस्टार रजनीकांत यांनीही मर्सल चित्रपटाचे समर्थन केले आहे. 

मर्सल चित्रपटाने महत्त्वाचा विषय मांडला आहे, असे रजनीकांत यांनी म्हटले आहे. ट्विटच्या माध्यमातून मोजक्या शब्दांत त्यांनी स्पष्टपणे मर्सलची पाठराखण केली आहे. त्यांनी कोणताही ठराविक वादग्रस्त मुद्दा मांडला नाही. या चित्रपटामध्ये वस्तू व सेवा कर तथा GST बद्दल परखड विश्लेषण करून मर्मावर बोट ठेवले आहे. मात्र, यातील केंद्रीय करप्रणालीचे संदर्भ अयोग्य आहेत असे भाजपचे म्हणणे आहे. 

मोदी सरकारच्या जीएसटी आणि डिजिटल इंडिया या दोन उपक्रमांवर 'मर्सल'मध्ये टीका करण्यात आली आहे. भाजपने या दृश्यांवर आक्षेप घेत ती चित्रपटातून हटवण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही टि्वट करून या चित्रपटाचे समर्थन केले आहे. 'मोदी, मर्सल सिनेमा तमिळ संस्कृती आणि भाषेची अभिव्यक्ती आहे. मर्सलमध्ये हस्तक्षेप करुन तुम्ही तमिळ अभिमानावर बंदी आणू नका' असे टि्वट राहुल यांनी केले आहे. 

Web Title: mersal movie marathi news rajinikanth supports mersal