दिल्लीतील मेट्रो, दुकाने अंशत: होणार सुरू

कोरोना अनलॉकची प्रक्रिया सुरू ठेवताना सोमवारपासून (ता. ७) दिल्ली मेट्रो सेवा व दुकाने, मॉल अंशतः सुरू करण्यास परवानगी दिल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSakal

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील (Delhi) लॉकडाउन (Lockdown) १४ जूनच्या पहाटे ५ पर्यंत वाढविण्यात आला. त्याचवेळी कोरोना (Corona) अनलॉकची प्रक्रिया (Unlock Process) सुरू ठेवताना सोमवारपासून (ता. ७) दिल्ली मेट्रो सेवा (Metro Serivice) व दुकाने, (Shops) मॉल (Mall) अंशतः सुरू (Open) करण्यास परवानगी (Permission) दिल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आज दिली. (Metro in Delhi Shops will be Partially Open Arvind Kejriwal)

दिल्लीत हाहा:कार उडविणाऱ्या संसर्गाच्याच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्याने निश्वा:स सोडतानाच पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागारांनीच व्यक्त केलेल्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या तयारीला लागलेल्या दिल्ली सरकार अनलॉकबाबतीत सावध पावले टाकत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी दिल्ली सरकारने जी पावले उचलली त्यात मुलांसाठी विशेष कोरोना वॉर्डची सुविधा, चीनमधून ६ हजार ऑक्सिजन सिलेंडरची खरेदी, बाल उपचार कृती गटाची स्थापना, तिसऱ्या लाटेच्या ‘पीक’च्या काळात संभाव्य ३७ हजार रूग्णसंख्येच्या दृष्टीने दिल्लीच्या रुग्णालयांची तयारी, आदी उपायांचा समावेश आहे. दिल्लीत दैनंदिन रूग्णसंख्या ५०० च्या घरात आल्याने राज्य सरकारने सोमवारपासून आणखी काही व्यवहार सुरू करण्यास मुभा दिली.

Arvind Kejriwal
कधीही, कुठेही अचानकपणे झोपतात लोक, तेही 6 दिवस! काय आहे गावाचं रहस्य?

काय सुरू होणार

  • ऑड-इव्हन पद्धतीने दिवसाआड मॉल, दुकाने उघडतील. मात्र त्यांची वेळ सकाळी १० ते रात्री ८ अशी असेल.

  • सरकारी कार्यालयात ‘ए’ गटांचे अधिकारी १०० टक्के तर ‘बी’ गटातील अधिकाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती अनिवार्य.

  • खासगी कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ सुरूच ठेवावे. आवश्‍यकतेनुसार निम्मी उपस्थिती असावी

  • मेट्रो व डीटीसी सेवा५० टक्के क्षमतेने धावणार. मेट्रोचाही कालावधी घटविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com