मध्यमवर्गीय तरुणींचा नेत्यांचा समावेश असलेल्या सेक्‍स रॅकेटमध्ये बळी 

वृत्तसंस्था
Saturday, 28 September 2019

शासकीय सेवेतील बारा उच्चाधिकारी आणि आठ माजी मंत्र्यांना गळाला लावण्यासाठी या मुलींचा वापर करण्यात आल्याची कबुलीच या रॅकेटची सूत्रधार श्‍वेता जैन हिने आज विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) दिली आहे. 

भोपाळ : मध्य प्रदेशातील खंडणीसाठी चालविण्यात येणाऱ्या हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटमध्ये मध्यवर्गीय तरुणींचाच बळी गेल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. प्रशासकीय सेवेतील बारा उच्चाधिकारी आणि आठ माजी मंत्र्यांना गळाला लावण्यासाठी या मुलींचा वापर करण्यात आल्याची कबुलीच या रॅकेटची सूत्रधार श्‍वेता जैन हिने आज विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) दिली आहे. 

...सासरच्यांनी तिचे लग्न लावले सलमानसोबत!

हजारो कोटींची कंत्राटे मिळविण्याबरोबरच व्हीआयपींकडून पैसे उकळण्यासाठी हा हनीट्रॅप आखण्यात आला होता, अशी कबुलीही तिने दिली आहे. श्‍वेता आणि आरती दयाळ यांनी त्यांच्या कंपन्यांनाच सरकारी कामांची कंत्राटे मिळावीत म्हणून हा हनीट्रॅप आखला होता, त्यांना कमिशनच्या आधारावर ही कामे दिली जात होती. सरकारी कंत्राटे मिळविण्याबरोबरच बड्या आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्यांचा फैसलाही श्‍वेता आणि आरती या दोघी करत होत्या, एवढे वजन त्यांनी सरकार दरबारी निर्माण केले होते. श्‍वेताने अनेक मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणींना पैशाचे आमिष दाखवून त्यांना व्हीआयपींसोबत शय्यासोबत करण्यास भाग पाडल्याचे उघड झाले आहे. 

मध्यप्रदेशातील सेक्स रॅकेटचे मराठवाड्यातील मोठ्या नेत्यांशी कनेक्शन

विविध आमिषे 
काही तरुणींना चांगल्या महाविद्यालयात प्रवेश देण्याचे आमिष दाखवून या जाळ्यात ओढण्यात आले, तर काहींना हायप्रोफाईल जीवनशैलीसह पैशांचे आमिष दाखवून या रॅकेटमध्ये सामावून घेण्यात आले. राज्यातील माजी मंत्र्यांसह आमदार, खासदारांना गळाला लावण्यासाठी श्‍वेताने काही कॉल गर्ल्सचीदेखील मदत घेतली होती. अनेक मुलींना वाममार्गाला लावल्यानंतर त्यांनाच त्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल केले जात असे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: middle class girls trapped in sex racket at Bhopal