

Iran Issues Fresh Oil Supply Warning as Seven Killed in US Airstrikes
sakal
दुबई : अमेरिकेने इराणवर पुन्हा एकदा सागरी नाकेबंदी लादली असून, बुधवारी पहाटेपासून हवाई हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. या हल्ल्यांमध्ये इराणच्या लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले असून, सात सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर देशभरात २६० जण जखमी झाल्याची माहिती इराणी अधिकाऱ्यांनी दिली. अमेरिकेच्या या आक्रमक कृतीनंतर इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ने पश्चिम आशियातील तेल आणि वायूची निर्यात पूर्णपणे थांबविण्याचा इशारा दिला आहे.