
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या ३ महिन्यांहून जास्त काळ आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी आता आंदोलनाचा परीघ वाढविण्याचे ठरविले असून लवकरच शेतकरी दुधाची किंमत दुप्पटीने वाढवून म्हणजे १०० रुपये प्रतिलिटर करतील, अशी घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केल्याने दिल्लीत नजीकच्या काळात दुधाची जबर दरवाढ होण्याची चिन्हे आहेत.
नवी दिल्ली - कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या ३ महिन्यांहून जास्त काळ आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी आता आंदोलनाचा परीघ वाढविण्याचे ठरविले असून लवकरच शेतकरी दुधाची किंमत दुप्पटीने वाढवून म्हणजे १०० रुपये प्रतिलिटर करतील, अशी घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केल्याने दिल्लीत नजीकच्या काळात दुधाची जबर दरवाढ होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, हे आंदोलन दिल्लीच्या सीमांबरोबरच पंजाब, हरियाना व पश्चिम उत्तर प्रदेशाबाहेर देशाच्या अनेक राज्यांत वाढविण्याचेही शेतकरी संघटनांनी ठरविले आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारवर मागण्यांबाबत कडक व अहंकारी भूमिका घेत असल्याचा आरोप केला आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे समजून न घेता कृषीमंत्री नरेंद्र तोमर, आंदोलनाच्या गर्दीवर वादग्रस्त वक्तव्य देत असल्याबद्दल संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी निषेध व्यक्त केला. या आंदोलनात दुधाचे दर वाढविण्याचे शेतकऱ्यांनी जाहीर केल्याने दिल्लीसह संबंधित तिन्ही राज्यांतील दुधाचे दर लवकरच कडाडू शकतात. दिल्लीत सध्या मदर डेअरीच्या दुधाचे दर ५६, ५२, ५० व ४८ रुपये प्रती लिटर आहेत. ते एकदम दुपटीने वाढले तर सर्वसामान्यांसमोर मोठा पेच निर्माण होईल.
भारतीय रेल्वेची कमाल; काश्मीरमध्ये चिनाब नदीवर उभारला आयफेल टॉवरपेक्षाही उंच पूल
राकेश टिकैत यांच्या भारतीय किसान युनियनचे नेते मलकीतसिंग यांनी , शेतकरी लवकरच सरकारी यंत्रणांना विकल्या जाणाऱ्या दुधाचे दर दुप्पट करतील अशी घोषणा केली. ते म्हणाले की १ मार्चपासून शेतकरी हे दर दुपटीने म्हणजे १०० रुपये प्रतिलिटर इतके वाढवतील व तसे आवाहन तीनही राज्यांतील प्रत्येक दुग्धोत्पादन शेतकऱ्याला करणार आहोत. आतापर्यंत बहुतांश शेतकरी दूध ना नफा ना तोटा तत्त्वावरच विकत आले आहेत.
भारतात 'व्हॉट्सअॅप'वर येऊ शकते बंदी; जाणून घ्या यामागील कारण
शेतकऱ्यांनी पिके नष्ट करू नयेत
शेतकऱ्यांना सरकारचा निषेध करण्यासाठी त्यांची उभी पिके नष्ट करण्याचे कोणतेही आवाहन टिकैत यांनी केले नव्हते, असा खुलासा संघटनेने केला आहे. संघटनेचे महासचिव समशेर दहिया यांनी सांगितले, की शेतकऱ्यांनी पिके नष्ट करू नयेत, असे आवाहन टिकैत यांनी वारंवार केले आहे.
सामान्य जनता पेट्रोल १०० रुपये लिटरने खरेदी करू शकतो तर दुधासाठी तेवढाच भाव देण्यास त्याला काही अडचण होऊ नये.
- मलकितसिंग, भारतीय किसान युनियनचे नेते
Edited By - Prashant Patil