दुधवाल्याची हत्या, पत्नीच निघाली मास्टरमाईंड

झोया बेगमने असं का केलं?
love affair
love affair File photo

हैदराबाद: नवऱ्याची हत्या (Murder) केल्याच्या आरोपाखाली पहाडीशरीफ पोलिसांनी पत्नीसह चौघांना अटक केली आहे. झोया बेगम असे आरोपी महिलेचे नाव आहे. या हत्येमागे विवाहबाह्य संबंधाचे कारण आहे. शेख अदील असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याचा दुधाचा व्यवसाय (Milk vendor) आहे. सईद अली, मोहम्मद रियाझ, शेख माविय, मोहम्मद झाहेर अशी आरोपींची नाव आहेत. १९ ऑक्टोबरला शेख अदीलची हत्या करण्यात आली.

झोयाचे सईद अली बरोबर विवाहबाह्य संबंध होते. अदीलला हे समजल्यानंतर तो पत्नीवर संतापला होता. त्याने सईदपासून दूर राहण्याबद्दल पत्नीला बजावले होते. त्यानंतर झोया आणि सईदने शेख अदीलच्या हत्येचा कट रचला. सईदने आपल्या तीन मित्रांच्या मदतीनेच हत्येचा कट रचला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

love affair
तेव्हाच कॅन्सरबद्दल कळलं असतं तर.. - महेश मांजरेकर

प्लाननुसार झोयाने अदील घरी आल्यानंतर सईदला याची माहिती दिली. त्यानंतर चार आरोपी घरी पोहोचले व त्यांनी अदीलची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर निर्जन स्थळी त्यांनी अदीलचा मृतदेह जाळला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com