तेव्हाच कॅन्सरबद्दल कळलं असतं तर.. - महेश मांजरेकर

'अंतिम'च्या शूटिंगदरम्यान रक्तस्रावामुळे तपासणी केली असता मांजरेकरांना कॅन्सरचं निदान झालं.
Mahesh Manjrekar
Mahesh Manjrekar Instagram

सलमान खान Salman Khan आणि आयुश शर्मा यांचा बहुचर्चित 'अंतिम: द फायनल ट्रुथ' Antim हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मुळशी पॅटर्न' या सुपरहिट मराठी चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असून महेश मांजरेकरांनी Mahesh Manjrekar त्याचं दिग्दर्शन केलं आहे. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मांजरेकरांना कर्करोग झाल्याचं निदान झालं. शूटिंग पूर्ण केल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आणि आता ते 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या सिझनचं सूत्रसंचालन करताना दिसत आहेत.

'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या उपचाराबद्दल सांगितलं. दीड वर्षांपासून मूत्राशयावर उपचार सुरू होते आणि यावर्षी ऑगस्टमध्ये त्यांच्यावर कॅन्सरची शस्त्रक्रिया झाली. "मूत्राशयाच्या अतिक्रियाशीलतेवर दीड वर्षांपासून उपचार सुरू होते. पण अंतिमच्या शूटिंगदरम्यान एकेदिवशी रक्तस्राव होऊ लागला. तेव्हा तपासणी केली असता कर्करोगाचं निदान झालं. जर दीड वर्षांपूर्वीच मी उपचार केले असते तर आज वेगळी परिस्थिती असती", असं ते म्हणाले.

Mahesh Manjrekar
झी मराठी पुरस्कार सोहळ्यावर प्रेक्षकांनी व्यक्त केली नाराजी

सलमानने परदेशात जाऊन उपचार घेण्याचा मांजरेकरांना सल्ला दिला होता. मात्र भारतातील डॉक्टरांवर विश्वास असल्याने इथेच उपचार घेतल्याचं त्यांनी सांगितलं. "परदेशात जाऊन योग्य ते उपचार घ्या, असं सलमान मला म्हणाला होता. पण इथल्या डॉक्टरांवर मला विश्वास असल्याने इथेच उपचार घेण्याचं ठरवलं. किमोथेरेपीमुळे माझ्यावर फार परिणाम झाला नव्हता आणि त्यामुळे मी चित्रपटाचं शूटिंग संपवू शकेन असा विश्वास मला होता. शस्त्रक्रियेनंतर मला तीन महिने आरामच करायचं होतं. त्यामुळे मी शूटिंग संपवण्याकडे पूर्ण लक्ष दिलं", असं ते पुढे म्हणाले.

मांजरेकर यांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तींना कर्करोगाबद्दल चर्चा करू नका, असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळेच त्यांच्यावरील शस्त्रक्रिया पार पडल्याच्या दहा दिवसांनंतर माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com