esakal | वारिस पठाण नरमले, मागितली माफी; मनसेचं जोरदार प्रत्युत्तर 
sakal

बोलून बातमी शोधा

mim waris pathan apologies about his statement over hindu muslim

आज दिवसभरात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. सायंकाळपर्यंत वारिस पठाण यांना उपरती झाली आणि त्यांनी माफी मागितली.

वारिस पठाण नरमले, मागितली माफी; मनसेचं जोरदार प्रत्युत्तर 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : देशात 15 कोटी आहोत. पण, 100 कोटींवर भारी पडतो, असं धक्कादायक वक्तव्य करून, एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी नव्या वादाला तोंड फोडलं होतं. हिंदूंवर मुस्लिम भारी पडतात, अशा आशयाचं त्यांच वक्तव्य होतं. त्यावरून आज दिवसभरात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. सायंकाळपर्यंत पठाण यांना उपरती झाली आणि त्यांनी माफी मागितली. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वारिस पठाण यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन, त्यांचा प्रत्युत्तर दिलं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वारिस पठाण यांचा माफिनामा
कर्नाटक मधील गुलबर्गा येथे झालेल्या जाहीर सभेत वारिस पठाण यांनी खळबळजनक वक्तव्य केले होते. 'आम्ही 15 कोटी आहो आहोत (मुस्लिम) पण, आम्ही 100 कोटींवर भार पडतो,' या त्यांच्या वक्तव्यामुळं देशभरातून त्यांच्यावर टीका झाली. त्याच दखल घेत त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले, 'माझ्या व्यक्तव्याचा चुकीच्या पद्धतीने सादर करून, चुकीचा अर्थ लावण्यात आला. मी त्याविषयी दिलगिरी व्यक्त करतो. भाजप, भारतीयांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. वारिस पठाण हा शेवटचा व्यक्ती असेल जो धर्म आणि देशाच्या विरोधात बोलला असले.'

आणखी वाचा - आम्ही 15 कोटी, 100 कोटींना भारी, वारिस पठाण यांचे वक्तव्य 

मनसेनं झोडपलं
दरम्यान, वारिस पठाण यांच्या वक्तव्याची गंभीर दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं घेतलीय. मनसे अधिकृत या ट्विटर अकाऊंटवरून, पठाण यांना झोडपलंय, मनसेनं म्हटलंय की, 'आम्ही...' 'तुम्ही...' असले भेद आम्हाला मान्य नाहीत. पण.... 'आम्ही' इतके, 'तुम्ही' तितके... अशी भाषा करणाऱ्या वाचाळवीरांना 'आम्ही' इतकंच सांगतो की जर शिवरायांचा तिसरा नेत्र उघडला तर 'तुम्ही' सगळेच भस्मसात व्हाल! या ट्विटर वर तुफान रिअॅक्शन आल्या. सोशल मीडियावरून दिवसभरात पठाण यांना विरोध झाल्यानंतर त्यांनी माफिनामा दिला.

आणखी वाचा - शाहीन बाग बरकरार है!

कोण आहेत वारिस पठाण?
व्यवसायानं वकील असलेले वारिस पठाण एमआयएमचे नेते आहेत. मुंबईतील भायखळ विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचा शिवसेनेकडून पराभव झाला. शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव यांनी त्यांचा पराभव केला. याही पेक्षा वारिस पठाण यांची आणखी एक वादग्रस्त ओळख आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र घेतल्यामुळं वारिस पठाण प्रकाश झोतात आले होते. त्यानंतर सलमान खानच्या हीट अँड रन केसमध्येही वारिस पठाण यांनी सलमानचे वकीलपत्र घेतले होते.