
Video : योगी सरकारमध्ये नाही VIP संस्कृती; मंत्र्याने केली समर्थकाच्या आंघोळ
उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्र्याने पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरी रात्र काढल्यानंतर हातपंपाच्या पाण्याने आंघोळ (Minister bathe) करतानाचा व्हिडिओ (Video) पोस्ट केला. तसेच योगी सरकारमध्ये ‘व्हीआयपी संस्कृती’ नाही असेही म्हटले. औद्योगिक विकास मंत्री नंद गोपाल गुप्ता ‘नंदी’ यांनी शाहजहांपूर जिल्ह्याच्या दौऱ्यात काढलेला व्हिडिओ ट्विट केला आहे. (Minister bathes on supporters house)
ट्विट केलेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये (Video) गुप्ता तयार होताना दिसत आहेत. व्हिडिओसोबतच त्यांनी ट्विटवर लिहिले आहे ‘योगी सरकार आणि आधीच्या सरकारांमध्ये हाच फरक आहे. योगी सरकारमध्ये सामान्य जनता आणि सरकारमध्ये कोणतेही अंतर नाही, कोणताही फरक नाही आणि व्हीआयपी संस्कृतीही नाही.’
हेही वाचा: पाकिस्तानी ड्रोन भारताच्या हद्दीत घुसला; बीएसएफने केला गोळीबार
गेल्या आठवड्यात बरेली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मंत्री भरतौल गावात कोणाच्या तरी घरी रात्रभर थांबले होते. तेथेही त्यांनी हँडपंपच्या पाण्यात आंघोळ केली आणि व्हिडिओ शेअर केला होता. मंत्र्यांच्या साधेपणाबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. ‘प्रत्येकाला हा साधेपणा आवडतो’, असे एका यूजरने लिहिले. दुसऱ्या एका व्यक्तीने मंत्र्याचे उत्साही वर्णन केले. त्यांनी लिहिले आहे, ‘खूप छान, दमदार दिसत आहेत, जमिनीशी जोडलेले आहेत.’
दिवसाची सुरुवात चहाने
एका क्लिपमध्ये तो हातपंपाजवळ आंघोळ करताना दिसत आहे. ही क्लिप शाहजहांपूर जिल्ह्यातील चक कान्हाऊ गावातील आहे. दिवसाची सुरुवात चहाने केली आणि मग आंघोळ केली असे मंत्री म्हणाले.
Web Title: Minister Bathes On Supporters House Uttar Pradesh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..