पाकिस्तानी ड्रोन भारताच्या हद्दीत घुसला; बीएसएफने केला गोळीबार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistani drone enters Indian border

पाकिस्तानी ड्रोन भारताच्या हद्दीत घुसला; बीएसएफने केला गोळीबार

जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पुन्हा एकदा ड्रोन दिसले आहेत. सीमा सुरक्षा दल (BSF) अर्निया सेक्टरमध्ये ड्रोन (drone) दिसला. यानंतर बीएसएफच्या जवानांनी गोळीबार सुरू केला. आठ राउंड फायर केल्यानंतर ड्रोन पाकिस्तानकडे (Pakistan) जाताना दिसले. (Pakistani drone enters Indian border)

आरएस पुरा उपविभागातील अरनिया भागात रात्री ७.२५ वाजता पाकिस्तानकडून येणारे ड्रोन दिसले. त्याने बहुधा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली नसावी. बीएसएफने जारी केलेल्या निवेदनानुसार, जवानांनी ड्रोनवर (drone) आठ राऊंड गोळीबार (BSF fired) केला. त्यानंतर तो लगेच परतला. जम्मूच्या अरनिया सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ ड्रोन दिसल्याचे सांगण्यात येत आहे. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय सीमेवरील सतर्कता आणखी वाढवण्यात आली आहे. परिसरात शोध घेतला जात आहे. अद्याप काहीही सापडलेले नाही.

हेही वाचा: साहेबऽऽ माझ्या पत्नीला कुटुंबीयांनी सासरी फरफटत नेले

याआधीही अनेकवेळा पाकिस्तानातून (Pakistan) येणारे ड्रोन (drone) या भागात दिसले आहेत. मात्र, बीएसएफच्या जवानांनी त्यांच्यावर गोळीबार करताच ते परतले. जम्मूमध्ये संशयास्पद ड्रोन पाहण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

Web Title: Pakistani Drone Enters Indian Border The Bsf Fired

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :PakistanIndiafireDroneBSF
go to top