
शिक्षकाकडे तक्रार केल्याचा बदला, पाच विद्यार्थ्यांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
पाटणा : शिकवणी वर्गाच्या शिक्षकाकडे तक्रार केल्याच्या रागातून एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Minor Girl Physical Abused) झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बिहारच्या जमुई (Jamui Bihar) जिल्ह्यात ही घटना घडली असून बलात्कार करणारे पाचही विद्यार्थी त्याच शिकवणी वर्गातील आहेत. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा: सामूहिक बलात्कार पीडितेवर पोलिस ठाण्यातच पुन्हा बलात्कार, अधिकारी निलंबित
पीडितेच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी विद्यार्थ्यांनी यापूर्वी मुलीसोबत गैरवर्तन केले होते. याबाबत शिकवणी वर्गाच्या शिक्षकांकडे तक्रार केली होती. यापुढे मुलीला त्रास होणार नाही, असं आश्वासन शिक्षकाने दिलं. त्यानंतर मुलीला परत शिकवणी वर्गाला पाठवण्याचा निर्णय घेतला. पण, या आरोपी विद्यार्थ्यांनी तक्रारीचा राग काढण्यासाठी सामूहिक बलात्काराचा कट रचला. पीडिता रात्रीच्या सुमारास शिकवणी वर्गावरून परतत असताना पाचही विद्यार्थ्यांनी तिला बळजबरीने जवळच्या जंगलात नेले. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
मुलगी घरी आली नाही म्हणून पालकांनी तिचा शोध घेतला. काही तासानंतर मुलीचा शोध लागला. पण, तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले. त्यानंतर पालकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. आरोपी विद्यार्थ्यांविरोधात तक्रार नोंदवली. त्यानतंर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे. तसेच मुलीला उपचार आणि वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
Web Title: Minor Girl Physical Abused By Five Student In Jamui Of Bihar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..