Delhi Crime : दोन वर्षापूर्वी बलात्कार करणाऱ्या व्यक्तिच्या आईवर अल्पवयीन मुलीचा गोळीबार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi Crime : दोन वर्षापूर्वी बलात्कार करणाऱ्या व्यक्तिच्या आईवर अल्पवयीन मुलीचा गोळीबार

Delhi Crime : दोन वर्षापूर्वी बलात्कार करणाऱ्या व्यक्तिच्या आईवर अल्पवयीन मुलीचा गोळीबार

नवी दिल्ली : दिल्लीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने एका ५० वर्षीय महिलेवर गोळ्या झाडल्या आहेत. पोलिसांनी या मुलीला अटक केली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले. सध्या महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. (Delhi Crime news)

त्याचबरोबर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे. मुलीने दोन वर्षापूर्वी गोळीबार केलेल्या महिलेच्या मुलाच्या विरोधात कथित बलात्काराचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. या घटनेनंतर त्या व्यक्तीला तुरुंगात पाठवण्यात आले होते.

हेही वाचा: PM Narendra Modi : हिराबेन यांच्या मृत्यूनंतर PM मोदींची पत्नी नजरकैदेत? व्हिडीओ व्हायरल

शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही महिला तिच्या दुकानात असताना अल्पवयीन मुलीने येऊन तिच्यावर गोळ्या झाडल्या. दरम्यान तिला शेजाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. 

हेही वाचा: Sanjay Raut : "संजय राऊत भांग पिऊन आमच्यासोबत फोटो काढला का?"

पोलीस उपायुक्त उपायुक्त संजय सैन म्हणाले, "चौकशीत समोर आले आहे की गोळीबार झालेली महिला किराणा दुकान चालवते. त्यांच्या २५ वर्षीय मुलाला दोन वर्षापूर्वी तुरुंगात पाठवण्यात आले होते. १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने त्याच्याविरोधात कथित बलात्कार आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली होती. प्रथमदर्शनी अल्पवयीन मुलगी शस्त्र घेऊन दुकानात आली आणि तिने महिलेवर गोळ्या झाडल्या. तिला पकडण्यात आले असून शस्त्र जप्त करण्यात आले आहे.”

हेही वाचा: ChatGPT: Google चे धाबे दणाणार, टक्कर देण्यासाठी Microsoft-ChatGPT ने तयार केला खास प्लॅन

दरम्यान महिलेला जीटीबी रुग्णालयात हलवण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची मुले वेगळी राहतात. त्यांना या प्रकरणाची माहिती नव्हती. दरम्यान, मुलीकडे पिस्तूल कुठून आणले, यामागचा हेतू याबाबत चौकशी केली जात आहे.

हेही वाचा: Praniti Shinde : भाजपला चितपट करण्यासाठी काँग्रेसची मोठी खेळी; पक्षानं प्रणिती शिंदेंना दिली नवी जबाबदारी