कुत्र भुंकल्याचा राग; अल्पवयीन तरुणाकडून रॉडने वृद्धाची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

कुत्र भुंकल्याचा राग; अल्पवयीन तरुणाकडून रॉडने वृद्धाची हत्या

दिल्लीतील नजफगडमधील नांगला डेअरी गावात एका वृद्धाची एका अल्पवयीन मुलाने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अतिशय क्षुल्लक कारणावरून झालेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ माजली आहे. या वृद्धाकडे असलेला कुत्रा भुंकला म्हणून अल्पवयीन मुलाने ही हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, आधी त्याने कुत्र्याला मारलं, त्यावेळी वृद्ध व्यक्ती कुत्र्याला वाचवण्यासाठी आला. यावेळी संतापलेल्या तरुणाने वृद्धाच्या डोक्यात रॉड मारला.

हेही वाचा: धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यु; वर्गमित्रांनी केली होती बेदम मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती मृत अशोक कुमार यांची पत्नी मीना यांनी दिली. 85 वर्षीय अशोक कुमार यांची पत्नी मीना यांनी सांगितलं की, एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या पतीवर लोखंडी रॉडने हल्ला केला. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे त्यांचा मृत्यू झाला. अल्पवयीन आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी सुत्र फिरवली आहेत.

हेही वाचा: पाण्याची पाईप फोडली म्हणून दलित तरुणाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

Web Title: Minor Killed Old Man Due To Dog Barking

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Crime News