esakal | चुकीच्या माहितीचा व्हायरल फिव्हर; कोरोनाबाबत खोट्या माहितीचा मोठा प्रसार
sakal

बोलून बातमी शोधा

चुकीच्या माहितीचा व्हायरल फिव्हर; कोरोनाबाबत खोट्या माहितीचा मोठा प्रसार

चुकीच्या माहितीचा व्हायरल फिव्हर; कोरोनाबाबत खोट्या माहितीचा मोठा प्रसार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : देशातील इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असताना लोकांत पुरेशी नेट साक्षरता नसल्याने चुकीच्या माहितीचा देखील वेगाने प्रसार होताना दिसतो आहे. भारतामध्ये कोरोनाबाबत सर्वाधिक चुकीच्या माहितीची निर्मिती झाल्याचे एका संशोधनातून उघड झाले आहे. अमेरिकेतील आघाडीच्या ‘सेज’ या प्रकाशन संस्थेच्या ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन आणि इन्स्टिट्यूशन’ या नियतकालिकात याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनासाठी जगभरातील १३८ देशांतील ९ हजार ६५७ घटनांचे विश्‍लेषण करण्यात आले होते. विविध क्षेत्रांतील ९४ आघाडीच्या संस्थांनी त्यांच्याशी संबंधित तथ्यांची पडताळणी करण्याचे काम केले होते. या घटनांची व्यापकता आणि विविध देशांतील चुकीच्या माहितीचे स्रोत आदींची पडताळणी करण्यात आली.

हेही वाचा: भागवतांचा फोटो कुणा महिलेसोबत दिसलाय का?- राहुल गांधी

भारताप्रमाणेच अमेरिकेलाही फटका

भारतामध्ये इंटरनेटवर चुकीच्या माहितीची निर्मिती होण्याचे प्रमाण हे १८.०७ टक्के एवढे असून भारताप्रमाणेच (१५.९४ टक्के) अमेरिका (९.७४ टक्के), ब्राझील (८.५७ टक्के) आणि स्पेनमधील (८.०३ टक्के) नेटीझन्सना देखील चुकीच्या माहितीचा मोठा फटका बसला आहे. या सगळ्या चुकीच्या माहितीचा कोरोना उद्रेकाशी संबंध असल्याचे उघड झाले आहे.

फेसबुकवरचे प्रमाण अधिक

सोशल मीडियाने ८४.९४ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात चुकीच्या आणि खोट्या माहितीची निर्मिती केली असून इंटरनेटच्या बाबतीत हेच प्रमाण ९०.५ टक्के एवढे आहे. यातील बरीचशी चुकीची माहिती ही कोरोनाशी संबंधित आहे. सोशल मीडियाच्या बाबतीत केवळ फेसबुकचा विचार केला तर या प्लॅटफॉर्मवरून ६६.८७ टक्के एवढ्या प्रमाणात चुकीची माहिती प्रसारित झाल्याचे उघड झाले आहे.

हेही वाचा: हृतिकच्या घराच्या भिंतीवरील ओल पाहून चाहतीचा प्रश्न; अभिनेत्याचं भन्नाट उत्तर

आरोग्य संघटनेचा इशारा

कोरोनाशी संबंधित चुकीच्या माहितीचा जगभर प्रसार होऊ लागल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनेही चिंता व्यक्त केली होती. या माहितीमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला होता. कोणत्याही माहितीवर विश्‍वास ठेवण्यापूर्वी ती दोनवेळा पडताळून पाहण्यात यावी,असे आवाहन देखील संघटनेकडून करण्यात आले होते.

loading image
go to top