esakal | हृतिकच्या घराच्या भिंतीवरील ओल पाहून चाहतीचा प्रश्न; अभिनेत्याचं भन्नाट उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

हृतिकच्या घराच्या भिंतीवरील ओल पाहून चाहतीचा प्रश्न; अभिनेत्याचं भन्नाट उत्तर

हृतिकच्या घराच्या भिंतीवरील ओल पाहून चाहतीचा प्रश्न; अभिनेत्याचं भन्नाट उत्तर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेता हृतिक रोशनने Hrithik Roshan सोशल मीडियावर त्याच्या घरातील एक फोटो नुकताच पोस्ट केला. या फोटोमध्ये हृतिक निवांत सेल्फी काढताना दिसत आहे. मात्र या फोटोमधील एका वेगळ्याच गोष्टीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. पावसाळ्यात अनेक घरांमध्ये भिंतीला ओल Seepage येण्याचे प्रकार घडत असतात. हृतिकच्या घरातील भिंतीवरील ओल पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्यापैकी एका चाहतीच्या प्रश्नावर हृतिकने भन्नाट उत्तर दिलं आहे. सध्या सोशल मीडियावर हृतिकच्या या फोटोची आणि त्याने दिलेल्या उत्तराचीच चर्चा आहे.

भिंतीला ओल येण्याच्या समस्येवर काहीच ठोस उपाय नाही, हे आता सिद्ध झाले आहे, अशी मजेशीर कमेंट एकाने केली. तर श्रीमंतांच्या घरातही ओल येण्याची समस्या असते हे पाहून बरं वाटलं, असं दुसऱ्याने म्हटलं. 'निरखून पहा, हृतिक रोशनच्या घरातील भिंतीवर ओल', असं एका चाहतीने लिहिलं. त्यावर हृतिकने तिला उत्तर दिलं, 'सध्या भाड्याच्या घरात राहतोय. लवकरच नवीन घर घेणार आहे.' पावसाळ्यात भिंतीला ओल येण्याच्या समस्येला सर्वसामान्यांना सामोरं जावंच लागतं. मात्र सेलिब्रिटीच्याही घरात भिंतीला ओल दिसल्याने त्यावर अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला.

हेही वाचा: अफगाणिस्तानात अडकला अभिनेत्रीचा मेहुणा; महिनाभरापासून होऊ शकला नाही संपर्क

हेही वाचा: सिद्धार्थ चांदेकरची 'सांग तू आहेस का' मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

हृतिक रोशन लवकरच अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत एका बिग बजेट चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. सिद्धार्थ आनंदच्या या चित्रपटाचं नाव 'फायटर' असल्याचं समजतंय. या चित्रपटात अनेक साहसदृश्ये असल्याने त्यासाठी हृतिक खूप मेहनत घेत आहे. या चित्रपटासाठी जगभरातील ठराविक लोकेशन्स निवडून त्याठिकाणी शूटिंग केले जाणार आहे.

loading image
go to top