Mission Aditya: चंद्रावरील स्वारीनंतर आता भारत घालणार 'सूर्य नमस्कार'; ISROनं जाहीर केलं 'मिशन आदित्य'

चांद्रयान-३च्या घवघवीत यशानंतर भारत घालणार 'सूर्य प्रदक्षिणा', सुर्यावर जाण्यासाठी आखण्यात आलं मिशन 'आदित्य.
Mission Aditya: चंद्रावरील स्वारीनंतर आता भारत घालणार 'सूर्य नमस्कार'; ISROनं जाहीर केलं 'मिशन आदित्य'

Mission Aditya ISRO:मिशन चांद्रयान नंतर भारत आता सुर्यनमस्कार घालण्याची तयारी करत आहे. सुर्याच्या रहस्यांचा उलगडा करण्यासाठी ईस्रोने जोरदार तयारी सुरु केली आहे. चांद्रयान-३च्या यशस्वी वाटचालीनंतर सुर्याचे अध्ययन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या उपग्रहाचा फोटो जारी करण्यात आला आहे. भारताचे सुर्याकडे हे पहिले पाऊल असणार आहे.

हा उपग्रह प्रक्षेपणासाठी श्रीहरिकोटा येथे पोहोचलाय. इस्रोने सुर्याचे अध्ययन करण्यासाठी सुरु केलेल्या या मिशनला आदित्य-एल-१ असे नावद देण्यात आले आहे. सुर्य आपल्या सुर्यमालेतील सर्वात जवळील आणि सर्वात मोठा ऑब्जेक्ट आहे. सुर्याचं अंदाजे वय ४.५ बिलियन वर्ष आहे. सुर्य हायड्रोजन आणि हेलियमपासून बनलेला वायूंचा गोळा आहे.

२३ ऑगस्टला चांद्रयान-३ चंद्रावर पोहोचेल असा अंदाज लावला जातोय. त्यानंतर काही आठवड्यानंतर मिशन सुर्य सुरु करण्यात येईल. त्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था १५०० किलोचा रोबोटिक उपग्रह लॉंच करणार आहे. यामाध्यामातून सुर्याचे निरीक्षण करण्यात येईल. यासाठी ४०० कोटींमध्ये सौर वेधशाळा तयार करण्यात आली आहे. हा उपग्रह सुर्याच्या लाटा आणि सुर्यावर येणाऱ्या वादळांवर नजर ठेवणार आहे.

इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले की 'आदित्य एल-१'सुर्यावर सतत लक्ष ठेवणार आहे. हा उपग्रह आपल्याला सुर्याच्या विद्युत चुंबकीय प्रभावांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याची सुचना आधीचं देईल. जर वेळेच्या आधी सुचना मिळाली तर उपग्रह, बाकीचे विद्युत साधनांना नुकसान होण्यापासून वाचवले जाऊ शकते.

Mission Aditya: चंद्रावरील स्वारीनंतर आता भारत घालणार 'सूर्य नमस्कार'; ISROनं जाहीर केलं 'मिशन आदित्य'
Nawab Malik Latest Update: नवाब मलिक कोणत्या गटात जाणार?, छगन भुजबळांनी दिला 'हा' सल्ला

पृथ्वीवरील जीवनामध्ये सुर्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. सुर्यकिरणांच्या मदतीने झाडांना प्रकाश संश्लेषणाच्या कार्यात कार्बन डायऑक्साईडच्या मधून ग्लुकोज निर्माण करण्यात मदत होते. आपली पृथ्वी 'गोल्डीलॉक्स झोन'मध्ये येते, जी सुर्यापासून जास्त लांबही नाही, जास्त जवळही नाही. यामुळे पृथ्वीवर जीवन विकसीत होण्याचा चालना मिळाली. इस्रोचे अध्यक्ष म्हणाले की,"अंतराळात भारताचे पन्नासपेक्षा जास्त उपग्रह आहेत. ज्याची किंमत ५०,००० कोटींपेक्षा जास्त आहे. या सर्वांना सुर्याच्या क्रोधापासून वाचवण्याची गरज आहे. "

Mission Aditya: चंद्रावरील स्वारीनंतर आता भारत घालणार 'सूर्य नमस्कार'; ISROनं जाहीर केलं 'मिशन आदित्य'
Chandrachud Fake Message: व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठात CJI चंद्रचूड यांच्या नावे फिरतोय फेक मेसेज; काय आहे प्रकरण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com