बंगाल निवडणुकीचा 'सुपर संडे'! PM मोदींची सभा, मिथुन चक्रवर्तींचा भाजप प्रवेश?

narendra modi mithoon chakraborty.
narendra modi mithoon chakraborty.

कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या तारखा जवळ आल्याने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयार केली आहे. आज बंगालमध्ये 'सुपर संडे' पाहायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. ते रविवारी कोलकाताच्या ब्रिगेट परेड मैदानात एका सभेला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत अभिनेता मिथुन चक्रवर्तीही उपस्थित राहणार आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी संदर्भातील माहिती दिली. पंतप्रधान मोदी रविवारी सभा घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुकतील. राज्यात आठ टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर भाजपचा पश्चिम बंगालमधील हा पहिला मोठा कार्यक्रम असणार आहे. भाजपने ही सभा यशस्वी करण्यााठी मोठी गर्दी जमा करण्याची योजना बनवली आहे. त्यामुळे मोदींच्या या मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 

भाजप राज्य विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष उमेदवारांची यादी शुक्रवारी जारी करणार होते, पण पंतप्रधान मोदींची सभा होणार असल्याने ते टाळण्यात आले. भाजप नेता राहुल सिन्हा यांनी सांगितलं की, सभा झाल्यानंतर पक्ष उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. भाजपच्या होणाऱ्या या रॅलीमध्ये पंतप्रधान मोदींसोबत अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. 

भाजप नेता विजयवर्गीय म्हणाले की, कोलकातामधील पंतप्रधान मोदींच्या रॅलीदरम्यान बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती उपस्थित राहतील.  विजयवर्गीय म्हणाले की, मिथुन चक्रवर्ती यांच्या भाजप प्रवेशाविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही. असे असले तरी मिथुन चक्रवर्ती यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगू लागली आहे. पश्चिम बंगालमध्ये 27 मार्चपासून आठ टप्प्यात मतदान होईल, ज्याचा निकाल 2 मे रोजी लागेल. 

पश्चिम बंगालमध्ये भाजप जोर लावत असली, तरी प्रचाराची सर्व भीस्त पंतप्रधान मोदी यांच्यावर आहे. पंप्रधान मोदी 8 टप्प्यातील मतदानासाठी जवळपास 1 डझनहून अधिक सभा घेण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये यश मिळवण्याची भाजपला आशा आहे. मोदींच्या सभेचा शेड्यूल अजून तयार झालेला नाही, पण पक्षाच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार ते प्रत्येक टप्प्यातील मतदानापूर्वी दोन वेळा लोकांना संबोधित करतील.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com