

MLC Election result
Esakal
विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशातही होत आहेत. उत्तर प्रदेशात काही मतदारसंघात गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे. गोरखपूरमध्ये सील न केलेला बॉक्स आढळल्याचा दावा अपक्ष उमेदवाराने केलाय. तर एका पेटीत नोंद झालेल्या आकडेवारीपेक्षा ५२ मतं जास्त आढळली आहेत. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीवेळी मोबाईल लॅपटॉप बाळगण्यावर बंदी घालण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे.