Divya Pahuja Murder: मॉडेल दिव्या पहुजाचा हत्या प्रकरणी महत्वाचा पुरावा हाती; कॅनलमध्ये आढळला मृतदेह

पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
Model Divya Pahuja Shot Dead In Gurugram
Model Divya Pahuja Shot Dead In Gurugram

नवी दिल्ली : मॉडेल दिव्या पहुजा हत्या प्रकरणात एक महत्वाचा पुरावा हाती आला आहे. हरयाणा पोलिसांना दिव्याचा मृतदेह तोहाना इथल्या कॅनॉलमध्ये आढळून आला आहे. गुरुग्राममधील एका हॉटेल मालकानं आपल्या दोन साथीदारांसह तिची गोळ्या घालून हत्या केली. हत्येनंतर त्यानं दिव्याचा मृतदेह आपल्या कारमधून पटियालाच्या दिशेने घेऊन गेले होते. (Model Divya Pahuja Murder Case police got Imp evidence her Body found in canal)

Model Divya Pahuja Shot Dead In Gurugram
Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खरगे इंडिया आघाडीचे नवे अध्यक्ष! नितीश कुमार नाराज? नाकारले संयोजक पद

पोलिसांच्या माहितीनुसार, दिव्या पहुजा (वय २७) हिची हत्या करण्यात आली कारण तिनं हॉटेल मालकाकडं त्याचे आक्षेपार्ह फोटो उघड करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

Model Divya Pahuja Shot Dead In Gurugram
Sarfaraz Khan : अजून काय करायचं...? नेटकऱ्यांनी निवडसमितीला घेतलं फैलावर

यामध्ये अभिजीत सिंह, हेमराज, ओम प्रकाश, मेघा फोगाट यांचा समावेश आहे. यांनी हत्येसाठी वापरलेलं पिस्तूल आणि दिव्याचं सामान लपवल्याचा आरोप आहे. तसेच बलराज गिल यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. यानं रवी बंगाच्या मदतीनं दिव्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली.

Model Divya Pahuja Shot Dead In Gurugram
Mumbai News: डोंबिवलीतील इमारतीला भीषण आग; पाच ते सहा मजले जळून खाक

नेमकं काय घडलं होतं?

२ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता हॉटेल सिटी पॉईंटमध्ये अभिजीतनं दिव्या पहुजा हिची गोळी घालून हत्या केली होती. त्यानंतर अभिजीतनं मृतदेह मार्गी लावण्यासाठी बलराज गिल आणि रवी बांगा यांना बोलावलं होतं. हे दोघेही हिस्सारच्या मॉडेल टाऊनचे रहिवासी आहेत. बलराज गिल हा अनेक वर्षांपासून अभिजीतसोबत त्याच्या दिल्लीच्या साऊथ एक्सटेंशन इथल्या घरी रहायला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com