esakal | मोदी कॅबिनेटमध्ये OBC, SC आणि युवकांचा वाढणार टक्का?
sakal

बोलून बातमी शोधा

narendra modi

मोदी कॅबिनेटमध्ये OBC, SC आणि युवकांचा वाढणार टक्का?

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. त्यानुसार, मोदींच्या कॅबिनेटमध्ये ओबीसी, अनुसुचित जाती, युवक आणि व्यावसायिकांना प्रतिनिधीत्व मिळण्याची शक्यता आहे. कॅबिनेटचा विस्तार उद्या (७ जुलै) संध्याकाळी किंवा ८ जुलै रोजी सकाळी होण्याची शक्यता आहे, असं एएनआय या वृत्तसंस्थेनं आपल्या सुत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे.

मोदी आपल्या मंत्रिमंडळात OBC आणि SC ना मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधीत्व देण्याच्या विचारात आहेत. त्यानुसार मंत्रिमंडळात १५ ते २० सदस्य एससी आणि ओबीसी प्रवर्गातील असतील असं सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर महिलांचं प्रतिनिधीत्वही या मंत्रिमंडळात वाढण्याची शक्यता आहे. विविध राज्यांमधील प्रशासकीय विभागांनाही प्रतिनिधीत्व दिल्याचं पहायला मिळू शकतं. त्याचबरोबर युवक आणि उद्योग जगताला देखील यामध्ये प्रतिनिधीत्व दिलं जाण्याची शक्यता आहे. यामुळे मोदींच्या कॅबिनेटचं हे अधिक तरुण होणार आहे.

हेही वाचा: Corona Update: राज्यात दिवसभरात ८,४१८ नव्या रुग्णांची वाढ

त्याचबरोबर मोदी कॅबिनेटमध्ये फेरबदल करताना अनुभव आणि शिक्षण या बाबींचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच या मंत्रिमंडळात व्यावसायिक, पीएचडीधारक आणि एमबीएधारक तसेच पदव्युतर पदवीधारकांना संधी मिळू शकते. त्याचबरोबर ज्या नेत्यांना प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. म्हणजेच ज्यांनी विविध प्रकारची मंत्रालयं सांभाळली आहेत. तसेच ज्यांनी संसद सदस्य म्हणून मोठा काळ घालवला आहे, अशा व्यक्तींनाही या नव्या कॅबिनेटमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.

केंद्रात आता नवं सहकार मंत्रालय

केंद्रातील मोदी सरकारमध्ये आता नव्या सहकार मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली आहे. 'सहकार से समृद्धी' असं या मंत्रालयाचं व्हिजन असेल. देशातील सहकार चळवळीतील प्रशासन, कायदे, धोरणात्मक चौकटीची क्षमता वाढवणे हा या नव्या मंत्रालयाचा उद्देश असणार आहे.

loading image