

narendra Modi Cabinet Reshuffle
esakal
Narendra Modi Cabinet Reshuffle : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सप्टेंबरच्या सुरुवातीला विस्तार आणि फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बिहारमधील काही केंद्रीय मंत्र्यांच्या पदाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अद्याप महाराष्ट्रातील कोणत्याही केंद्रिय मंत्र्यांच्या नेत्यांमध्ये फेरबदल होण्याच्या हालचाली दिसत नसल्या तरी ऐनवेळी काहीही राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.