केंद्र सरकार 23 नव्हे तर 26 कंपन्यांचे करणार खाजगीकरण; वाचा यादी

nirmala
nirmala
Updated on

नवी दिल्ली - जगभर कोरोनाने थैमान घातले असून यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेवरही कोरोनामुळे परिणाम झाला आहे. आधीच आर्थिक मंदीचा सामना करत असताना कोरोनाने परिस्थिती बिकट झाली. त्यामुळे अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. आता केंद्राने सरकारी उपक्रमांमधील भागिदारी विकण्याची योजना सुरु केली असून अर्थमंत्र्यांनी याबाबत 27 जुलै रोजी मोठी घोषणासुद्धा केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील 23 कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवल्याची माहिती अर्थंमंत्री निर्मला सितारामन यांनी दिली होती.

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी खाजगीकरणाची घोषणा करताना कोणत्या कंपन्यांची भागीदारी विकणार आहे याची माहिती दिली नव्हती. आता याबाबत आरटीआयमधून माहिती समोर आली आहे. त्यामध्ये 23 नव्हे तर 26 कंपन्यांमधील सरकारी भागिदारी विकण्याची तयारी सुरु असल्याचं समोर आलं आहे.

केंद्र सरकार कोणत्या कंपन्यांमधील भागिदारी विकणार आहे याची माहिती आरटीआयच्या माध्यामातून मागवण्यात आली होती. त्यात 26 कंपन्यांची नावे, विकल्या गेलेल्या भागीदारीची टक्केवारी बाजारपेठेनुसार ठरवण्यात येईल असं सागितंल आहे. तसंच यामध्ये युको बँकेचं खाजगीकरण होणार का याबद्दल विचारण्यात आलं होतं. पण याबद्दल माहिती उपलब्ध नसल्याचं सांगितलं आहे.

1. Project & Development India Limited (PDIL)
2. Engineering Projects India Limited (EPIL)
3. Pawan Hans Limited (PHL)
4. B&R Company Limited (B&R)
5. Air India
6. Central Electronics Limited(CEL)
7.Cement Corporation India Limited CCIL (Nayagaon unit)
8.Indian Medicine & Pharmaceuticals Corporation Ltd. (IMPCL)
9.Salem Steel Plant, Bhadrawati Steel Plant, Durgapur Steel plan
10.Ferro Scrap Nigam Ltd. (FSNL)
11.Nagarnar Steel Plant of NDMC
12.Bharat Earth Movers Limited (BEML)
13.HLL Lifecare
14.Bharat Petroleum Corporation Ltd. (BPCL)
15.Shipping Corporation of India Ltd. (SCI)
16.Container Corporation of India Ltd (CONCOR)
17.Nilachal Ispat Nigam Limited (NINL).
18.Hindustan Prefab Limited (HPL)
19.Bharat Pumps and Compressors Ltd (BCPL)
20.Scooters India Ltd (SIL)
21.Hindustan Newsprint Ltd (HNL)
22.Karnataka Antibiotics & Pharmaceuticals Ltd (KAPL)
23.Bengal Chemicals and Pharmaceuticals Ltd. (BCPL)
24.Hindustan Antibiotics Ltd. (HAL)
25.Indian Tourism Development Corporation (ITDC)
26.Hindustan Fluorocarbon Ltd (HFL)

आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या अंतर्गत सरकार सर्व सेक्टर्समध्ये खाजगी क्षेत्राला संधी देण्याचा विचार करत आहे. तसंच इतर क्षेत्रांच्या खाजगीकरणाच्या धोरणाचा अंतिम निर्णय झाला नसल्याचंही अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी यापूर्वी सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com