

Modi Cabinet Reshuffle Monsoon Session Parliament
esakal
Narendra Modi Cabinet Expansion : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. आगामी संसदेचे पावसाळी अधिवेशन आणि पुढील वर्षी होणाऱ्या सात राज्यांच्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. कामगिरीचा आढावा, राजकीय समतोल आणि आगामी निवडणुकांची रणनीती लक्षात घेऊन काही मंत्र्यांना वगळले जाण्याची, तर नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.