'मोदी सरकारच्या गब्बर टॅक्समुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला'

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 6 September 2020

देशाची अर्थव्यवस्था कोलमडण्यासाठी मोदी सरकारने लागू केलेला गब्बर टॅक्स मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. जीएसटीमुळे सर्वकाही उद्धवस्त झाले आहे, असा उल्लेखही त्यांनी केला आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी देशाच्या  नकारात्मक जीडीपीवरुन (GDP) मोदी सरकारवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. मोदी सरकारच्या वस्तू आणि सेवा कर (GST) धोरणामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशातील अर्थव्यवस्थेच्या चिंताजनक परिस्थितीसंदर्भात राहुल गांधी यांनी रविवारी तिसरा व्हिडिओ शेअर केलाय. मोदीसरकारने GST च्या माध्यमातून छोटे आणि मध्यम व्यापारी , शेतकरी तसेच मजूर यांच्यावर आक्रमण केले, असा घणाघाती आरोप त्यांनी केलाय. 

"पंतप्रधान मोदी एक महान नेता, भारतीय-अमेरिकी मलाच मत देतील"


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: modi governments gst is major reason for historic gdp says rahul gandhi