
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडेच भारताच्या अर्थव्यवस्थेला डेड इकॉनॉमी (मृत अर्थव्यवस्था) असं म्हटलं होतं. ट्रम्प यांच्या टीकेनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून थेट संदेश दिला आहे. भारत आता जगातली सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे असं मोदींनी म्हटलंय. देशवासियांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करावा आणि आता वेळ आलीय की प्रत्येक भारतीयाने कोणतीही गोष्ट खरेदी करताना देशहिताला प्राधान्य द्यायला हवं असेही मोदी म्हणाले.