Mohali Blast : पाकिस्तानात बसलेल्या रिंडानेच केला हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohali Blast : पाकिस्तानात बसलेल्या रिंडानेच केला हल्ला

Mohali Blast : पाकिस्तानात बसलेल्या रिंडानेच केला हल्ला

मोहाली : मोहालीतील पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यलयावर काल रॉकेट हल्ल्यानंतर (Rocket Attack) एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा हल्ला पाकिस्तानात बसलेल्या हरविंदर सिंग रिंडा (Harvindar Singh Rinda) याने केल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रिंडाने त्याच्या दोन स्थानिक हँडलर्सच्या मदतीने हा हल्ला केल्याचे पोलिसांना मिळालेल्या पुराव्यांवरुन उघड झाले आहे. (Mohali Blast News)

हेही वाचा: Shivkumar Sharma: प्रख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचं निधन

नुकत्याच पंजाबमधील करनाल भागत जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांच्या मागेदेखील याच रिंडाचा हात होता. त्यानेच ड्रोनच्या सहाय्याने ही हत्यारे भारतात पाठवली होती. या हत्यारांच्या आणि दारूगोळ्याच्या मदतीने रिंडाचा भारतातील विविध भागात हल्ले (Terrorist Attack) करण्याची योजना होती. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा डाव उधळण्यात आला.

हेही वाचा: पाकिस्तान ते तेलंगाणा via पंजाब; दहशतवाद्यांच्या तस्करी कारवाया सुरूच

हल्ल्यानंतर काहीजण पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, मोहाली येथे झालेल्या हल्ल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींकडून अशा प्रकारचा हल्ला करण्याच्या सूचना पाकिस्तानस्थित (Pakistan) दहशतवादी हरविंदर रिंडा आणि त्याच्या माणसांकडून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे या हल्ल्यामागे पाकिस्ताना बसलेला रिंडाचा हात असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.

Web Title: Mohali Blast Pakistan Based Terrorist Harinder Singh Rinda Behind Mohali Attack

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top