हिमस्खलनापासून आता जवान स्वत:चा करू शकणार बचाव; निवृत्त अधिकाऱ्याकडून प्रशिक्षण

वृत्तसंस्था
रविवार, 8 डिसेंबर 2019

- मोहम्मद इलियास अहमद आता काश्‍मीर खोऱ्यातील भारतीय जवानांना देणार हिमस्खलनापासून बचावाचे धडे.

श्रीनगर : आपल्या 31 वर्षांच्या सेवेनंतर लष्करातून निवृत्त झालेले 63 वर्षीय मानद कॅप्टन मोहम्मद इलियास अहमद आता काश्‍मीर खोऱ्यातील भारतीय जवानांना हिमस्खलनापासून बचावाचे धडे देत आहेत. हिवाळा सुरू होण्यापूर्वी हिमस्खलन बचाव संघाच्या (एआरटी) प्रशिक्षण शिबिरासाठी अहमद यांच्या सेवेचा उपयोग लष्कराने करून घेतला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

हिमस्खलन ही काश्‍मीर खोऱ्यातील मोठी समस्या आहे. हिस्खलनामुळे अनेकदा जवानांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे 2016 मध्ये लष्कराच्या जम्मू-काश्‍मीर लाइट इन्फंट्रीमधून निवृत्त झालेल्या अहमद यांनी पुढाकार घेत लष्करातील जवानांना अशा प्रकारच्या घटनांचा सामना कशा प्रकारे करायचा, याचे प्रशिक्षण दिले आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले, ""तुम्ही एकदा लष्करात दाखल झालात तर मरेपर्यंत लष्करात असता. तसेच मी "बलिदानम वीर लक्ष्मणम' या तत्त्वाचे पालन करतो आहे. मी मरेपर्यंत एक सैनिक असणार आहे.'' 

मानेसरमध्ये प्लॅस्टिक कारखान्याला भीषण आग

डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला तंगधर येथील लष्करच्या छावणीवर हिमस्खलन झाले होते. त्या वेळी त्यांच्या अनुभवाचा फायदा बचाव पथकाला झाला. या वेळी त्यांनी या बचाव पथकाचे नेतृत्व केले. त्यांच्या बचाव पथकाने खराब हवामान आणि अत्यंत कठीण परिस्थितीत पाच तास चालत जाऊन हिमस्खलनात अडकलेल्या जवानांना सोडवण्यासाठी प्रयत्न केले.

कौतुकास्पद ! फायरमनच्या धाडसामुळे 11 जणांना मिळाले जीवदान

"दुर्दैवाने या वेळी आम्ही फक्त एका सैनिकाला जिवंत वाचवू शकलो. आम्ही येण्यापूर्वीच तीन शूर सैनिक निसर्गाच्या रोषाला बळी पडले होते,'' असे अहमद यांनी या बचाव मोहिमेबद्दल बोलताना सांगितले. अहमद यांच्या लष्करातील गौरवशाली सेवेसाठी 15व्या तुकडीचे प्रमुख लेफ्टनंट जनरल के. जे. एस. धिल्लन यांनी शनिवारी त्यांचा "चिनार कोअर पदका'ने गौरव केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mohammad Ilyas retired army captain who continues to save our lives